आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Mamata Banerjee Government Coal Scam Update; TMC Leaders Houses Raided By Central Bureau Of Investigation Enforcement Directorate

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोळसा घोटाळ्यात अडकले ममता सरकार:CBI आणि ED ने तृणमूल नेत्यांच्या जवळच्या व्यावसायिकाच्या घरांवर मारले छापे; अनेक अधिकारी आणि नेतेही रडारवर

कोलकाता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ममतांची सून आणि नातेवाईकांचीही झाली आहे चौकशी

पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळ्याचा तपास आता अधिकारी आणि तृणमूल नेत्यांपर्यंत पोहोचला आहे. तृणमूलच्या जवळच्या व्यावसायिकाच्या घरांवर सीबीआय आणि ईडीने शुक्रवारी छापा टाकला. दक्षिण कोलकाता, आसनसोल येथील घरे व कार्यालये येथे छापे टाकण्यात आले आहेत. कोळशाच्या तस्करीच्या वेळी अनेक अधिकारी व नेत्यांनी लाच घेतल्याचेही तपासात समोर आले आहे.

वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की लवकरच त्यांच्यावरही येथे छापे टाकले जाऊ शकतात. याच प्रकरणात गेल्या वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीला कोलकाताचे CA गणेश बगारिया यांच्या कार्यालयावप छापा टाकण्यात आला होता. सीबीआयच्या पथकाने ही कारवाई केली होती.

ममतांची सून आणि नातेवाईकांचीही झाली आहे चौकशी
या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी सीबीआयने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सून रुजिरा बॅनर्जी आणि रुजिराची बहीण मेनका गंभीर यांची चौकशी केली. पैशांच्या व्यवहार आणि मिळकतीच्या माध्यमांची माहिती दोघांकडून घेण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आता सीबीआय या सर्वांच्या बँक खाती आणि मालमत्तेचीही चौकशी करत आहे. चौकशीत ED चादेखील समावेश करण्यात आला आहे.

काळ्या बाजारात हजारो कोटींचा कोळसा विकल्याचा आरोप
कोळसा घोटाळ्याप्रकरणी तृणमूल नेत्यांवर आरोप आहे. यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचेही नाव आहे. बंगालमध्ये अनेक हजार कोटी कोळशाचे अवैधपणे उत्खनन केल्याचा आरोप आहे. हे रॅकेटद्वारे काळ्या बाजारात विकले गेले.

सप्टेंबर 2019 मध्ये कोळसा घोटाळ्याची चौकशी सुरू झाली
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोळसा घोटाळ्याची चौकशी सुरू झाली. तेव्हापासून भाजपचा आरोप आहे की, टीएमसी नेत्यांनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून कोळसा घोटाळ्यातील काळा पैसा पांढऱ्या पैशात रूपांतरित केला. याचा सर्वात मोठा फायदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेकला झाला आहे.

अभिषेक तृणमूलच्या युवा संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी विनय मिश्रा यांच्यासह 15 तरुणांना आपल्या पक्षात सरचिटणीस बनवले होते. विनय यांच्यावर सुरुवातीपासूनच कोळसा घोटाळ्याचा आरोप आहे. तृणमूलने सीबीआय चौकशीला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...