आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mamata Banerjee Narendra Modi Meeting Update | West Bengal CM Will Meet PM Modi In Delhi Today

ममतांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट:त्रिपुरा हिंसाचार आणि BSF च्या अधिकारक्षेत्राचा मुद्दा केला उपस्थित; भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचीही घेतली भेट

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी आज सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. तत्पूर्वी, दुपारी 3.30 वाजता ममता यांनी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचीही भेट घेतली.

मोदींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या- मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राज्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. बीएसएफच्या कार्यक्षेत्राच्या विस्ताराच्या मुद्द्यावरही मी त्यांच्याशी बोलले आणि हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

त्रिपुरातील हिंसाचाराबद्दलही झाली चर्चा
पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत ममता यांनी त्रिपुरातील हिंसाचाराच्या मुद्द्यांव्यतिरिक्त राज्याच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्रिपुरातील बिप्लब देब यांचे सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप ममता यांनी केला आहे. याआधी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने त्रिपुरामध्ये होणाऱ्या नागरी निवडणुकांना स्थगिती देण्याची टीएमसीची याचिका फेटाळून लावली होती.

तत्पूर्वी बुधवारी दुपारी 3.30 वाजता ममता यांनी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचीही भेट घेतली.
तत्पूर्वी बुधवारी दुपारी 3.30 वाजता ममता यांनी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचीही भेट घेतली.

पोटनिवडणुकीत विजयानंतरची पहिली दिल्ली दौरा
2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या दणदणीत विजयानंतर ममतांची ही दुसरी दिल्ली भेट आहे. या विजयासह त्या सलग तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. 30 सप्टेंबर रोजी झालेल्या भवानीपूर पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.

बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर ममता यांनी 27 जुलै 2021 रोजी पंतप्रधानांची भेट घेतली होती.
बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर ममता यांनी 27 जुलै 2021 रोजी पंतप्रधानांची भेट घेतली होती.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतल्या ममता
ममता बॅनर्जी यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बंगालमध्ये 'खेला होबे' हा नारा दिल्यानंतर, दीदींचे पुढचे लक्ष्य लोकसभा निवडणुकीनंतर तिसरा पर्याय म्हणून उभे राहण्याचे आहे. देशभरात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दीदींनी कसरतही सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीकडेही त्यांची नजर आहे.

बातम्या आणखी आहेत...