आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mamata Banerjee Narendra Modi | West Bengal Chief Minister Mamata Banerjee Delhi Visit Latest Update; PM Narendra Modi, PM Modi, Kamalnath, Congress Leaders; News And Live Updates

ममता-मोदी भेट:भेटीनंतर म्हणाल्या - बंगालच्या लोकसंख्येनुसार लस द्या, राज्याचे नाव बदलण्यावर चर्चा; उद्या सोनिया गांधींची घेणार भेट

नवी दिल्ली/कोलकाता3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पेगासस प्रकरणावर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी - ममता बनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी संध्याकाळी भेट घेतली आहे. दरम्यान, ममता यांनी देशातील कोरोनाची स्थितीवर पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. बंगाल राज्याला मिळणारी लसीची मात्रा वाढवण्यास सांगितले असून बंगालला लोकसंख्येनुसार लस मिळावी अशी मागणीदेखील ममता यांनी पंतप्रधानांना यावेळी केली आहे. त्यासोबतच राज्याचे नाव बदलण्यावरदेखील चर्चा झाली असल्याचे ममता यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

पेगासस प्रकरणावर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी - ममता बनर्जी
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या 5 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आलेल्या आहेत. त्या म्हणाल्या की, 'मी दोन वर्षानंतर दिल्लीला आले आहे. निवडणुकांनंतर भेट घ्यावीच लागते, त्यामुळे मी आज पंतप्रधानांना भेटायला गेले. घटनेनुसार हा प्रोटोकॉल असून मी त्याचे पालन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं त्या यावेळी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेतली.
ममता बॅनर्जी यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेतली.

राष्ट्रपतींना भेटण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल
ममता बॅनर्जी उद्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, राष्ट्रपतींनी त्यांना परवा दिवशी भेटण्याची वेळ दिली असून आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. यावर ममता म्हणाल्या की, आम्ही कोरोना लसीची दोन्ही डोस घेतलेले असून आम्ही दिल्ली बाहेरील असल्याने आरटीपीसीआर चाचणी कुठे करावी असा प्रश्न उपस्थित केला आहे.

बातम्या आणखी आहेत...