आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mamata Banerjee Press Conference Update; Nandigram News | BJP Office In Arambagh Set On Fire After West Bengal Elections Results

आता सामना कोरोनाशी:53 दिवसानंतर व्हीलचेयर शिवाय दिसल्या ममता बॅनर्जी; म्हणाल्या- डबल सेंचुरीचा विश्वास अधिपासूनच होता

कोलकाताएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधानांना मोफत लसीची मागणी करणार

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या व्हीलचेयरशिवाय दिसल्या. त्यांना 10 मार्चला प्रचारादरम्यान दुखापत झाली होती. यानंतर मागील 53 दिवसांपासून त्या प्लास्टरमध्ये प्रचार करत होत्य. आता अचानक त्यांना ठीक झालेलं पाहून भाजपने हे सर्व नाटक असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या निकालानंतर कोलकातामधील भाजप कार्यालयात आग लावण्यात आली आहे, यामागे तृणमूलचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

221 जागांचे लक्ष्य ठेवले होते

पत्रकार परिषदेत ममता म्हणाल्यी की, मला आधीपासूनच डबल सेंच्युरीचा विश्वास होता. मी 221 जागांचे लक्ष्य ठेवले होते. हा विजय बंगालच्या लोकांना वाचवण्याचा विजय आहे. 'खेला होबे' आणि 'जय बांग्ला', दोन्ही खूप कामी आले. आता निवडणूक संपली आहे. आपल्याला आता कोरोनाशी सामना करायचा आहे. आता आपण या महामारीविरोधात काम करू. या विजयानंतर आम्ही कुठलाच जल्लोष करणार नाहीत, लहानसा शपथविदी कार्यक्रम होईल.

ममतांच्या पराभवावर सस्पेंस

ममता आणि शुंभेदू अधिकारी यांच्या निकालावर अद्याप सस्पेंस कायम आहे. पण, ममता यांच्या विधानावरुन त्यांचा पराभव झाल्याचे दिसत आहे. पत्रकार परिषदेदरम्यान ममता म्हणाल्या की, नंदीग्रामबाबत जास्त ताण घेऊ नका.मी नंदीग्रामसाठी संघर्ष केलाय. नंदीग्रामच्या लोकांनी जो कौल दिलाय, तो मला मान्य आहे.

पंतप्रधानांना मोफत लसीची मागणी करणार

यावेळी त्या म्हणाल्यी की, बंगालमधील प्रत्येक नागरिकाला मोफत लस दिली जाईल. मी पंतप्रधानांना अपील करते की, आम्हाला फ्री व्हॅक्सीन द्यावी. जर असे झाले नाही, तर मी गांधी प्रतिमेच्या समोर बसुन सर्व देशासाठी फ्री व्हॅक्सीनची मागणी करेल.

बातम्या आणखी आहेत...