आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये बुधवारी संध्याकाळी जखमी झाल्या. या घटनेनंतर त्यांना कोलकाता येथे नेले जात आहे. त्यांनी आजच नंदीग्राम येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. या घटनेनंतर ममता यांनी म्हटले की, 'त्या कारमध्ये बसत असताना कुणी तरी त्यांना धक्का दिला. यामुळेच त्यांच्या पायाला दुखापत झाली.'
ममता यांच्यावर हल्ल्यानंतर पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह म्हणाले, 'ममता बॅनर्जी यांनी सहानुभिती मिळवण्यासाठी ड्रामा केला. त्यांच्यासोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. अशा वेळी त्यांच्या जवळ कोण पोहोचू शकते? जे 4 IPS अधिकारी त्यांच्या सुरक्षेचे इंचार्ज आहेत. त्यांना सस्पेंड करण्यात आले पाहिजे. हल्ला करणारे अचानक तर प्रकट होणार नाही. त्यांना पकडण्यात आले पाहिजे.'
Nandigram: West Bengal CM Mamata Banerjee says she has suffered an injury in her leg after few people pushed her as when she was near her car pic.twitter.com/wx69lVdsbB
— ANI (@ANI) March 10, 2021
ममतांचा सामना शुभेंदुंसोबत
विधानसभा निवडणुकीत ममता यांचा सामना त्यांचे निकटवर्तीय राहिलेल्या शुभेंदू अधिकारीसोबत आहे. शुभेंदू यांनी तृणमूल कॉंग्रेसचा हात सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. शुभेंदू 12 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यापूर्वी ते नंदीग्राममधील आपल्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.