आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशभरातील विरोधी पक्ष 2024 ची लोकसभा निवडणूक एकतेने लढण्याची भाषा करत आहेत. पण पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (TMC) विरोधकांच्या या प्रयत्नांना जोरदार धक्का देत आगामी सार्वत्रिक निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्या गुरुवारी म्हणाल्या - तृणमूल 2024 ची निवडणूक स्वबळावर लढवेल. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी आघाडी करणार नाही. टीएमसीची आघाडी थेट जनतेसोबत असेल.
विरोधी पक्षांनी गत बुधवारीच (1 मार्च) तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त ऐक्याचा नारा दिला होता. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी सर्वच विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
ममता म्हणाल्या - भाजपला पराभूत करण्याची इच्छा असणऱ्यांनी TMC ला मतदान करावे
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या - भाजपला पराभूत करण्याची इच्छा असणारे आम्हाला मतदान करतील असा मला विश्वास आहे. जनता आमच्यासोबत असून, 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होईल.
बंगालच्या मुख्यमंत्री त्रिपुरा विधानसभेतील निवडणूक निकालावर बोलत होत्या. त्या म्हणाल्या - जे लोक माकप व काँग्रेसला मतदान करत आहेत, प्रत्यक्षात ते भाजपलाच मतदान करत आहेत. वस्तुस्थिती आज उजेडात आली आहे. टीएमसीला त्रिपुरा विधानसभेत एकही जागा मिळाली नाही हे विशेष.
भाजपने सागरदिघी विधानसभा मतदार संघातील मतदान काँग्रेसला ट्रान्सफर केले - ममता
ममता बॅनर्जी यांनी सागरदीघीमधील काँग्रेस-डाव्या आघाडीच्या उमेदवाराच्या विजयावर मोठा दावा केला. भाजपने सागरदिघी विधानसभा निवडणुकीतील आपली मते काँग्रेसला ट्रान्सफर केली, असे त्या म्हणाल्या. सागरदिघी मतदार संघातील पोटनिवडणूक काँग्रेसच्या बायरन बिस्वास यांचा जवळपास 23 हजार मतांनी विजय झाला आहे.
UPA मध्ये सहभागी होण्याची इच्छा नाही
ममतांनी काँग्रेसवर तिखट टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ममतांनी यापूर्वीच सध्या यूपीए वगैरे काहीही अस्तित्वात नसल्याचे भाष्य केले होते. तसेच विरोधकांना आता मजबूत पर्यायाची गरज असल्याचेही म्हटले होते. ममतांनी हे विधान गतवर्षी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर केले होते.
राहुल मेघालयमध्ये म्हणाले होते -TMC ची भाजपला आणण्याची इच्छा
शिलाँगमध्ये राहुल गांधींनी भाजप व टीएमसीवर निशाणा साधल्यानंतर काँग्रेस व तृणमूलमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. ते म्हणाले होते - तुम्हाला टीएमसीचा इतिहास माहीत आहे. बंगालमधील हिंसाचाराचीही आपल्याला कल्पना आहे. त्याची परंपरा साऱ्या जगाला माहीत आहे. टीएमसीने गोव्यात जाऊन निवडणुकीवेळी भरपूर पैसा खर्च केला. कारण त्यांचा उद्देश भाजपला मदत करणे हा होता. मेघालयातही भाजपला सत्तेत आणण्याचे टीएमसीचे उद्दिष्ट आहे. राहुल यांचे संपूर्ण विधान येथे वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.