आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal Government | Mamata Banerjee | Dearness Allowance | Central Government

बंगालच्या कर्मचाऱ्यांनी मागितला केंद्राएवढा DA:ममता म्हणाल्या - माझे शिर कापले तरी, महागाई भत्ता वाढवू शकत नाही

कोलकाता14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगालमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी केंद्रासारखा महागाई भत्ता (DA) वाढवण्याची मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांनी यासंबंधी निदर्शनेही केली आहेत. त्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारला आपले मुंडके कापले तरी आपण डीएत वाढ करू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्या म्हणाल्या - कर्मचाऱ्यांनी माझे शिरकान केले तरी बंगाल सरकार त्यांच्या डीएत वाढ करू शकत नाही.

CM म्हणाल्या - सरकार जे देईल त्याचा स्वीकार करा

ममतांनी केंद्र व राज्य सरकारच्या वेतन संरचनेतील फरक स्पष्ट करत तृणमूल काँग्रेस सरकार पूर्वीपासूनच आपल्या कर्मचाऱ्यांना 105% DA देत असल्याचा दावा केला. राज्य कर्मचाऱ्यांना पूर्वीपासूनच 105 टक्के डीए मिळत आहे. तुम्हाला आणखी काय हवे आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतनमान केंद्रीय कर्मचाऱ्यांपेक्षा वेगळे असते, असे त्या म्हणाल्या.

भत्त्यात 3% ची वाढ, त्यावर कर्मचारी नाराज

उल्लेखनीय बाब म्हणजे 2023-24 च्या अर्थसंकल्पात पश्चिम बंगालच्या अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी राज्य सरकारच्या कर्मचारी व पेंशनर्सच्या महागाई भत्त्यात 3% ची वाढ करण्याची घोषणा केली होती.

त्याला कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध केला. या प्रकरणी त्यांनी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी राज्यभर तीव्र निदर्शनेही सुरू केली आहेत.

बातम्या आणखी आहेत...