आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Mamata Banerjee Update | West Bengal CM Mamata Banerjee Unique Protest Against Against LPG Gas Cylinder Fuel Price Hike

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्राविरोधात ई-स्कूटीवर ममता बॅनर्जी:बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा केला विरोध, गळ्यात महागाईचे पोस्टर लावून ई-स्कूटीवरुन सचिवालयात पोहोचल्या

कोलकाता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्हाला टोलखोर म्हणणारा भाजप दंगेखोर, धंदेखोर : ममता

पश्चिम बंगालमध्ये TMC विरुद्ध BJP यांचे राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी वाढत्या महागाईविषयी अनोख्या अंदाजात विरोध केला. गळ्यात महागाईचे पोस्टर लावून मुख्यमंत्री ई-स्कूटीवरुन राज्य सचिवालयपर्यंत पोहोचल्या. त्यांनी पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढवण्यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले. ममता यांच्या ई-बाइक रॅलीमध्ये मोठ्या संख्येत सचिवालयाचे कर्मचारीही उपस्थित होते.

दरम्यान ममता यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, 'भाजपने नोटाबंदी केली, तेलाचे दर वाढवले. मोदी सरकारने सर्व काही विकले. बीएसएनएल ते कोळसा पर्यंत सर्व काही विकले गेले. हे सरकार सर्वसामान्यांचे, तरुणांचे आणि शेतकर्‍यांचे विरोधी आहे. यांना बंगालपासून दूर ठेवावे लागेल, केंद्रातूनही काढावे लागेल.

आम्हाला टोलखोर म्हणणारा भाजप दंगेखोर, धंदेखोर : ममता
पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमधील शाब्दिक युद्ध वाढले आहे. पश्चिम बंगालमध्ये बुधवारी हुगळीतील रॅलीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना देशातील सर्वात मोठा दंगेखोर म्हटले. त्यांनी सांगितले की, बंगालवर बंगालचीच सत्ता असेल. गुजरातची बंगालवर सत्ता नसेल. मोदी बंगालवर राज्य करणार नाहीत. जसे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत झाले, मोदींसोबत त्यापेक्षाही वाईट होईल. मोदींनी एक दिवस आधी हुगळीत सभा घेतली होती.

मोदींसह शहाही द्वेष पसरवत आहेत. ममतांनी सांगितले की, प्रत्येक वेळी भाजप तृणमूल काँग्रेसला टोलखोर म्हणतो. मी म्हणते की, भाजप दंगेखाेर आणि धंदाखोर आहे. विधानसभा निवडणुकीत मी गोलकीपर असेल. भाजपला एकही गोल करता येणार नाही.

नड्डा म्हणाले - ममतांनी बंगालमध्ये केवळ हिंसा वाढवली

BJP राष्ट्रीय अध्यक्ष जेपीी नड्डा देखील बंगाल दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी एका कार्यक्रमाला संबंधीत करत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'ममता यांनी बंगालमध्ये केवळ हिंसा वाढवली आहे. केंद्र सरकार येथे योजनांना लागू होऊ देत नाही. भ्रष्ट्राचार करत आहे'

बातम्या आणखी आहेत...