आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mamata Banerjee Urges PM Modi For Tax Exemption On Medicines And Medical Equipment Amid Covid19 Surge; News And Live Udpates

5 दिवसात ममता यांचे मोदींना दुसरे पत्र:​​​​​​​बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या - लोक मदतीसाठी पुढे येत आहे, त्‍यामुळे औषधी आणि वैद्यकीय उपकरणांवरील कर हटवा

कोलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री होताच ममता यांनी मोदी यांना लिहले होते पत्र

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या 5 दिवसात पंतप्रधान मोदी यांना दुसरे पत्र लिहले आहे. त्यात त्यांनी कोरोना लढाईतील महत्वाचे वैद्यकीय उपकरण, औषधांवरील सर्व प्रकारचे कर आणि कस्टम ड्यूटी माफ करण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच पत्रात आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करत अत्यावश्यक औषधासह ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा पुरवठा वाढवण्याचीही मागणी केली आहे.

ममता यांनी पुढे म्हटले की, कोरोनाकाळात लोकांना मदत करण्यासाठी अनेक लोक, संस्था, संघटना पुढे येत असून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, सिलेंडर, कन्टेनर आणि कोरोनासंबंधी अत्यावश्यक औषधे दान करत आहे. परंतु, अशावेळी लोक संबंधित उपकरणांवरील SGST, CGST, IGST कर माफ करण्याचे विनंती करत असल्याचे ममता यांनी पत्रात म्हटले आहे.

GST किंवा कस्‍टम ड्यूटीपासून मुक्ती करा - ममता
या उपकराणांवरील दर केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असून केंद्राने यावरील GST किंवा कस्‍टम ड्यूटी व तत्सम करातून सुट दिली जावी. कारण यामुळे कोविड व्यवस्थापनात महत्वाचे उपकरणे आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा वाढवता येणार असल्याचे ममता यांनी पत्रात नमूद केले आहे.

मुख्यमंत्री होताच ममता यांनी मोदी यांना लिहले होते पत्र
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता यांनी 5 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान मोदी यांना कोविड व्यवस्थापनासंदर्भांत पहले पत्र लिहले होते. पत्रात ममता यांनी राज्यातील मोफत लसीकरणासाठी लसीचा पुरवठा केल्याची मागणी केली होती. त्यासोबतच राज्यात ऑक्सिजचा पुरवठा, हॉस्पिटल बेड आण‍ि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा वाढवण्यास सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...