आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-20 समूहाच्या बैठकींची तयारी:पंतप्रधान नरेंद्र माेदींना भेटणार ममता बॅनर्जी

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. सूत्रांनुसार, तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत येतील. त्यांनी पंतप्रधानांकडे बैठकीसाठी वेळ मागितली आहे. पंतप्रधानांनी जी-20 समूहाच्या बैठकींच्या तयारीसाठी ५ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांना राजधानीत बोलवले आहे. या बैठकीसाठी ममताही दिल्लीत येतील. ममता आणि केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या तणावात ही भेट महत्त्वाची मानली जाते. नुकतेच ममता यांनी राज्याची थकीत रक्कम न मिळाल्याबद्दल जीएसटी बंद करण्याचे सूतोवाच केले होते. सूत्रांनुसार, केंद्राच्या अनेक योजनांंतर्गत पश्चिम बंगालला निधी मिळत नाही.

बातम्या आणखी आहेत...