आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद दाराआड चर्चा:ममता-शहांची बंद दाराआड केंद्राच्या निधीबद्दल 15 ते 20 मिनिटे चर्चा, बाहेर चर्चेला उधाण

काेलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात रविवारी बंद दाराआड चर्चा झाली. शंभर दिवसांच्या याेजनेचा निधी केंद्राकडून मिळालेला नाही. त्याबद्दल उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

बॅनर्जी यांच्या केबिनमध्ये उभय नेत्यांत १५-२० मिनिटे ही चर्चा झाली. केंद्राकडून निधी देण्यात विलंब हाेण्यामागे असलेल्या अडचणींची माहिती शहा यांनी दिली. हा विषय राज्याच्या नियम व कार्यपद्धतीशी संबंधित आहे. ते दुरुस्त करण्याचे आश्वासन मिळाले आहे, असे प्रधान सचिव एच.के. द्विवेदी यांनी सांगितले. बैठकीत ममतांनी केंद्राला निधी मिळावा यासाठीची कागदपत्रे साेपवली. ममता म्हणाल्या, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत प. बंगालला अत्यल्प प्रमाणात निधी मिळाला.

बातम्या आणखी आहेत...