आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगाल विधानसभा निवडणूक:निवडणुकीपर्यंत तृणमूलमध्ये ममता एकट्या पडतील : गृहमंत्री अमित शहा

हावडा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तृणमूलमधून भाजपमध्ये मोठ्या संख्येने लोक येत आहेत. ते पाहता निवडणूक येईपर्यंत ममता बॅनर्जी या तृणमूलमध्ये एकट्याच राहतील, अशी जोरदार टीका शहा यांनी केली. पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रविवारी भाजपने जाहीर सभा घेतली. या सभेला गृहमंत्री अमित शहा यांनी ऑनलाइन संबोधित केले.

शहा व्हर्च्युअल सभेत म्हणाले, त्यांना पुढे कोणीही साथ देणार नाही. त्यांना लोक का सोडून जात आहेत याचा विचार त्यांनी केला पाहिजे. व्यासपीठावरून केेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही ममतांवर टीकास्त्र सोडले. ममता बंगालला पुढे घेऊन जाण्याच्या एेवजी पिछाडीवर घेऊन गेल्या आहेत. बंगालमध्ये भाजप सरकारने आल्यानंतर मंत्रिमंडळातील पहिला निर्णय आयुष्मान भारत याेजना लागू करण्यासंबंधी असेल. मोदींच्या कार्यक्रमात जय श्रीरामची घोषणाबाजी झाल्यानंतर नाराज ममतांवर श्रीरामांचे नाव घेऊन निशाणा साधला. ममतांनी भलेही प्रभू रामांचा त्याग केला असला तरी बंगालमध्ये रामराज्याने दार ठोठावले आहे. स्वार्थासाठी केंद्राशी वैर ठेवणे, जय श्रीरामच्या घोषणेचा अपमान करणाऱ्या पक्षात रामभक्त एक मिनिटही थांबू शकत नाही. तृणमूलमध्ये कट मनी येत नाही, तोपर्यंत काम होत नाही, हे जनतेला ठाऊक आहे. बंगालने अलीकडेच केवळ कोरोनाच नव्हे, तर अम्फान वादळालादेखील सोसले. केंद्र सरकारने वादळाचा इशारा ११ दिवसांपूर्वी दिला होता, परंतु दीदी, तुम्ही त्याकडेही दुर्लक्ष केले. तुम्ही सातत्याने अपमान करत राहिलेल्या भारतीय सैन्यानेच पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.

ममतादीदींनी काही दिवसांपूर्वी एक कागद पाठवला. त्यात किसान सन्मान निधी योजना लागू करण्याची तयारी दर्शवली आहे. दीदी, तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? या पत्रासोबत शेतकऱ्यांची यादीही आहे. बँक खात्याचा क्रमांकही आहे. तुम्ही यापैकी काहीही पाठवलेले नाही. घुसखोरीच्या प्रकरणात तृणमूल सरकारवर निशाणा साधताना शहा म्हणाले, ममतादीदी सरकारने बंगालच्या भूमीला रक्तरंजित केले आहे.