आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mamata Will Contest By Election From Bhawanipur: TMC MLA Shobhan Dev Chatterjee Resigns

ममतांची पारंपरिक जागा रिकामी:भवानीपूरमधून TMC आमदार शोभन देव यांचा राजीनामा, नंदीग्राममधून पराभूत झालेल्या ममता येथून निवडणूक लढवू शकतात

कोलकाता4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक हरलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी एक जागा रिक्त झाली आहे. तृणमूलचे आमदार शोभन देव चॅटर्जी भवानीपूर मतदारसंघातून राजीनामा दिला आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी येथून निवडणूक लढवू शकतात, कारण हा त्यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे.

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना तृणमूल पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर राहण्यासाठी ममता याना 6 महिन्यांच्या आत एका जागेवरुन आमदार निवडणूक जिंकावी लागेल.

मुखमंत्र्यांच्या जागेवरून जिंकलो, आता त्यांच्यासाठी जागा सोडत आहे - शोभन देव
राजीनामा दिल्यानंतर शोभन म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांच्या जागेवर उभा राहिलो आणि जिंकलो. मी आता या जागेवरुन राजीनामा देत आहे, जेणेकरून ममता बॅनर्जी निवडणूक लढवतील आणि मुख्यमंत्र्यांच्या जागेवर कायम राहतील.

तिसऱ्यांदा भवानीपूरमधून निवडणूक लढवणार आहेत ममता
बंगालमधील 2011 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलचे सुब्रत भवानीपूर येथून विजयी झाले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर ममतांनी येथे पोटनिवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. 2016 मध्ये त्यांची याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. या वेळीही शोभन यांनी राजीनामा दिल्यानंतर भवानीपूर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता प्रबळ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...