आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार:दीदी म्हणाल्या - 4 मंत्र्यांचे काम एकट्याने सांभाळणे शक्य नाही, 4 ते 5 नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल

कोलकाता9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार करण्याची घोषणा केली आहे. सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या जागा रिक्त आहेत. त्या स्वतः सर्व विभागांचे कामकाज पाहू शकत नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळात नव्या 4 ते 5 चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे त्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना म्हणाल्या.

ममतांनी राज्यात 7 नवे जिल्हे तयार करण्याचीही घोषणा केली आहे. या निर्णयामुळे पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांचा आकडा 30 वर पोहोचेल. ममतांनी यापूर्वी 28 जुलै रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती.

तत्पूर्वी, सूत्रांनी ममता तृणमूल काँग्रेसमध्ये कामराज प्लॅन लागू करणार असल्याचा दावा केला होता. हा प्लॅन 1963 मध्ये नेहरूंच्या राजवटीत काँग्रेसने लागू केला होता. साधन-सुब्रतचे निधन, पार्थ तुरुंगात

ममतांनी गत 28 जुलै रोजी मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या पार्थ चॅटर्जींच्या हकालपट्टीची घोषणा केली होती. त्यानंतर पुन्हा सोमवारी ही बैठक बोलावण्यात आली होती.

साधन-सुब्रतचे निधन, चॅटर्जी तुरुंगात

ममता मंत्रिमंडळातील टॉप-5 पैकी 4 पद रिक्त आहेत. कॅबिनेटमधील उच्चपदस्थ मंत्री सुब्रत मुखर्जी व साधन पांडे यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर चॅटर्जी तुरुंगाची हवा खात असल्यामुळे त्यांचे मंत्रिपद गेले आहे. अर्थमंत्री राहिलेले अमित मित्राही मंत्रिपद सोडून सल्लागार बनलेत.

'एक व्यक्ती-एक पद' फॉर्म्युला होणार लागू

तृणमूल काँग्रेसच्या गोटातील सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ फेरबदलात एक व्यक्ती - एक पद फॉर्म्युला लागू होऊ शकतो. सद्यस्थितीत परिवहन मंत्री फिरहाद हकीम यांच्यासह काही मंत्र्यांकडे 2 किंवा त्याहून अधिक जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्याकडील एखादे खाते काढून घेण्याची शक्यता आहे.

अभिषेक बॅनर्जी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गत फेब्रुवारी महिन्यातच पक्षात वन पोस्ट-वन फॉर्म्युला लागू करण्याची मागणी केली होती. त्यावर मोठा वाद झाला होता.

बाबुल-निर्मल शर्यतीत; खासदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी

सूत्रांच्या माहितीनुसार, तृणमूल सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपतून आलेल्या बाबुल सुप्रीयो व निर्मल माझी यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. याशिवाय पक्षाच्या अन्य काही खासदारांनाही मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. तर काही मंत्र्यांना बढती मिळण्याचा अंदाज आहे. पक्षाचे पूर्ण फोकस 2023 च्या स्थानिक स्वराज्य संस्था व त्यानंतर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर केंद्रीत आहे.

कामराज प्लॅन म्हणजे काय?

1962 च्या चीन युद्धातील पराभव व महागाईमुळे काँग्रेसच्या लोकप्रियतेत झपाट्याने घट होत होती. त्यानंतर 1963 मध्ये तत्कालीन मद्रासचे मुख्यमंत्री कामराज यांनी पंडित नेहरूंना एक फॉर्म्युला सूचवला. या फॉर्म्युल्यानुसार सर्वच मंत्री व मुख्यमंत्र्यांना पक्ष संघटनेच्या कामाला जुंपण्यात आले.

कामराज यांच्या या प्लॅनला काँग्रेसच्या कार्यकारी समितीने मंजुरी दिली. त्यानंतर सरकारमध्ये तो लागू होताच नेहरू मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांना आपल्या पदाचे राजीनामे द्यावे लागले. यात जगजीवन राम, लाल बहादूर शास्त्री व मोरारजी देसाईंसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...