आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय:विधानसभा त्रिशंकू झाल्यास ममता भाजपशी हातमिळवणी करतील, डावे पक्ष-काँग्रेस महाआघाडीच्या सभेत सीताराम येचुरींची टिप्पणी

कोलकाता/पुद्दुचेरी/ तिरुनेलवेलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय पक्षांनी प्रचार मोहिमेला वेग दिला आहे. काट्याची लढत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआघाडीने राजधानी कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राउंडमध्ये मोठी सभा घेतली. तीत माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी सत्तारूढ तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील लढाई म्हणजे ‘नूरा कुस्ती’ असल्याची टिप्पणी केली. ते म्हणाले की, विधानसभेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर ममता बॅनर्जी भाजपशी हातमिळ‌वणी करतील. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तयार केलेल्या पीएम केअर्स फंडातील पैशाचा वापर निवडणुकीच्या वेळी नेत्यांना खरेदी करण्यासाठी भाजप करत आहे, असा आरोपही येचुरी यांनी केला. या सभेत काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ‘डावे पक्ष आणि काँग्रेसची महाआघाडी तृणमूल काँग्रेस आणि भाजपचा पराभव करेल.’

मत्स्योद्योग मंत्रालय स्थापन झाले, पण राहुल यांना पत्ताच नाही : शहा
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी पुद्दुचेरीतील प्रचार सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मत्स्योद्योग मंत्रालयावरून टोमणा मारला. शहा म्हणाले,‘दोन वर्षांपूर्वी मत्स्योद्योग मंत्रालय स्थापन झाले, तेव्हा राहुल गांधी सुटीवर होते, त्यांना पत्ताच लागला नाही.’ राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पुद्दुचेरी दौऱ्यावर असताना मासेमारांसाठी मत्स्योद्योग मंत्रालयाची गरज व्यक्त केली होती.

काँग्रेसने इंग्रजांना हरवले, आता मोदींनाही हरवेल : राहुल गांधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या तिरुनेलवेली येथे प्रचार सभा घेतली. ते म्हणाले, ‘काँग्रेसने इंग्रजांना देशातून पळवून लावले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हरवेल.’ त्याआधी राहुल यांनी अरुलमिगू नेलियापर मंदिरात दर्शन घेतले आणि तिरुनेलवेलीमध्ये सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातील प्राध्यापकांशी चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...