आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mamta Banerjee Demands Change Of Bench; Mamata Banerjee, Shuvendu Adhikari, Nandigram Election Result Case; News And Live Updates

नंदीग्राम निवडणुकीला कोर्टात आव्हान:ममतांच्या याचिकेवर आज कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी; न्यायमूर्ती चंद्रा यांचे खंडपीठ बदलण्याची टीएमसीने केली मागणी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपूर्ण प्रकरण काय आहे?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभा निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान, ममता यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी केली जाणार आहे. सुनावणीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी न्यायमूर्ती चंद्रा यांच्या खंडपीठाला बदलण्याची मागणी केली आहे. अलिकडेच तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी न्यायमूर्ती चंद्रा यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यामध्ये न्यायमूर्ती चंद्रा या भाजप नेत्यांसोबत दिसत होत्या.

ममता यांनी गेल्या काही दिवसापूर्वी कोलकाता उच्च न्यायालयात भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्याविरुद्ध झालेल्या पराभवाला आव्हान दिले होते. ज्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगावर धांधलीचे आरोप करत नंदीग्राम निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु, निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले होते. ममता यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती चंद्रा यांचे खंडपीठ सुनावणी करणार होते. परंतु, ते फोटो शेअर झाल्यानंतर टीएमसी हे खंडपीठ बदलण्याची मागणी करत आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

  • पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक ही आठ टप्प्यात घेण्यात आली. त्यानंतर 2 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष फक्त नंदीग्रामवर होते. कारण ही निवडणूक ममता बॅनर्जी आणि एकेकाळी त्यांचे निकटवर्तीय असलेल्या भाजप उमेवार शुभेंदू अधिकारी यांच्यामध्ये होती. दरम्यान, अधिकारी यांनी ममतांना 1 हजार 956 मतांनी पराभूत केले. त्यानंतर ममता यांनी निवडणूक आयोगावर धांधलीचे आरोप करत नंदीग्राम निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु, निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले.
  • नंदीग्रामच्या निवडणूक निकालाविरोधात ममता यांनी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, त्यांनी या याचिकेत त्यांनी शुभेंदू अधिकारी यांच्यावर निवडणुकीत लाचखोरी, भ्रष्टाचार आणि धर्माच्या आधारे मते मागितल्याचा आरोप केला करत ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे.

तृणमूलने या निवडणुकीत 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या
पश्चिम बंगालच्या या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला चांगले यश मिळाले असून त्यांनी 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. परंतु, त्या स्वत: नंदीग्राम विधानसभा मतदार संघातून पराभूत झाल्या.

ममता यांनी 46 दिवसानंतर न्यायालयात दिले होते आव्हान
निकालाच्या दिवशी ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर धांधलीचे आरोप करत पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली होती. परंतु, निवडणूक आयोगाने त्यांची मागणी फेटाळून लावत शुभेंदू अधिकारी यांना विजयी घोषित केले होते. दरम्यान, त्यांनी या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले होते. अखेर त्यांनी 17 जून रोजी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

बातम्या आणखी आहेत...