आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mamta Banerjee TMC Rajya Sabha MP Dinesh Trivedi Resigning During Discussion In Parliament

ममता बॅनर्जींना मोठा धक्का:'माझ्या राज्यात हिंसा होत आहे आणि मी काहीच करू शकत नाही'; तृणमूलच्या खासदाराने थेट राज्यसभेत दिला राजीनामा

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 11 आमदार भाजपमध्ये सामील

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका लागला आहे. तृणमूलचे राज्यसभा खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या जवळचे असलेले दिनेश त्रिवेदी यांनी थेट राज्यसभेत राजीनामा दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, 'माझ्या राज्यात हिंसा होत आहे आणी मी काहीच करू शकत नाही.'

मी बंगालच्या जनतेसाठी काम करत राहीन

त्रिवेदी पुढे म्हणाले, ‘मी पक्षाचा आभारी आहे की, त्यांनी मला राज्यसभेवर पाठवले. पण मला आता गुदमरल्यासारखे वाटू लागले आहे, कारण माझ्या राज्यात होत असलेल्या हिंसेवर मी काहीच करू शकत नाहीये. माझी अंतरात्मा मला सांगत होती की, इथे बसून काहीच करू शकत नसशील, तर राजीनामा दे. राजीनामा दिला असला, तरीदखील मी बंगालच्या जनतेसाठी काम करत राहीन.’

आतापर्यंत 11 आमदार भाजपमध्ये सामील

बंगालमध्ये मागील दोन महिन्यात 11 तृणमूलच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याची सुरुवा तृणमूलचे जेष्ठ नेते शुभेंदु अधिकारी यांच्याने झाली. त्यानंतर खासदार सुनील मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की आणि 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...