आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mamta Banerjee Vs Shubhendu Adhikari | Mamta Banerjee, Shubhendu Adhikari, Nandigram Assembly Election 2021, Nandigram Assembly Election Result 2021, Calcutta High Court; News And Live Updates

निवडणूक निकालाविरोधात याचिका:कोलकाता उच्च न्यायालयात आज सुनावणी; ममता बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारी यांच्याविरुद्ध झालेल्या पराभवाला दिले आव्हान

कोलकाता4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 46 दिवसानंतर न्यायालयात आव्हान

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम निवडणुकीच्या निकालाविरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी नंदीग्राम येथील भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्यापासून मिळालेल्या पराभवाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे संबंधित याचिकेवर आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती कौशिक चंदा या व्हर्च्युअली पद्धतीने करणार आहे.

पश्चिम बंगालच्या या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला चांगले यश मिळाले असून त्यांनी 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. परंतु, त्या स्वत: नंदीग्राम विधानसभा मतदार संघातून पराभूत झाल्या.

2 मे रोजी होता निकाल, शुभेंदू विजयी
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक ही आठ टप्प्यात घेण्यात आली. त्यानंतर 2 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष फक्त नंदीग्रामवर होते. कारण ही निवडणूक ममता बॅनर्जी आणि एकेकाळी त्यांचे निकटवर्तीय असलेल्या भाजप उमेवार शुभेंदू अधिकारी यांच्यामध्ये होती. दरम्यान, अधिकारी यांनी ममतांना 1 हजार 956 मतांनी पराभूत केले. या निवडणुकीतील हे सर्वात मोठे बदल पाहायला मिळाले.

46 दिवसानंतर न्यायालयात आव्हान
निकालाच्या दिवशी ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर धांधलीचे आरोप करत पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली होती. परंतु, निवडणूक आयोगाने त्यांची मागणी फेटाळून लावत शुभेंदू अधिकारी यांना विजयी घोषित केले होते. दरम्यान, त्यांनी या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले होते. अखेर त्यांनी 17 जून रोजी कोलकात उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे यावर काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...