आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mamta Said On The Invitation Of Duty Path Ud Ghatana, Am I A Servant Of The Centre?

पश्चिम बंगालच्या सीएमचा संताप:कर्तव्यपथ उद् घाटनाच्या निमंत्रणावर ममता म्हणाल्या, मी केंद्राची नाेकर आहे का?

काेलकाता24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नवी दिल्लीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यासाठी केंद्राच्या निमंत्रणावरून ममता यांनी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या बैठकीत सांगितले की, “मला वाईट वाटते की ते आता दिल्लीत नेताजींचा पुतळा बनवत आहेत.” आधीच अस्तित्वात असलेल्या पुतळ्याचे काय? मला एका सेक्रेटरीकडून पत्र मिळाले आहे, ज्यात लिहिले आहे की, पंतप्रधान पुतळ्याचे उद्घाटन करतील. तुम्ही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी या. मी केंद्राची नाेकर आहे?’ नितीश, हेमंत सोरेन, मी एकत्र येईन : २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि इतर नेत्यांसोबत काम करणार असल्याची घोषणा ममता यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...