आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mamta Shubhendu In Nandigram; Shubhendu Said, It Is My Responsibility To Plant Lotus In Nandigram

पश्चिम बंगाल:नंदीग्राममध्ये ममता-शुभेंदू यांच्यात चुरस; शुभेंदू म्हणाले, नंदीग्राममध्ये कमळ फुलवण्याची जबाबदारी माझी

नवी दिल्ली/काेलकाताएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी भाजपत, आज मिथुनचा प्रवेश

पश्चिम बंगालमध्ये या वेळी सर्वाधिक उत्कंठावर्धक निवडणूक नंदीग्राममध्ये होणार आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पारंपरिक भवानीपूर मतदारसंघाऐवजी फक्त नंदीग्राममधून लढत आहेत. भाजपने ममतांचे माजी निकटवर्तीय आणि गतवेळी येथून जिंकलेल्या शुभेंदू अधिकारी यांना तिकीट दिले आहे.

भाजपने शनिवारी पश्चिम बंगालमध्ये आपल्या ५७ उमेदवारांची यादी जारी केली. यात शुभेंदू अधिकारी यांचे नाव सर्वात उल्लेखनीय आहे. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी तृणमूलमधून बाहेर पडत ममतांना आव्हान दिले होते. नंदीग्राममधून निवडणूक हरलो तर राजकारणच सोडून देऊ, अशी गर्जना त्यांनी केली होती. शुभेंदू म्हणाले की, ‘आम्ही तुम्हाला (ममतांना) राजकीय रणांगणावर पाहू. २ मे राेजी पराभूत होऊन तुम्ही नंदीग्राममधून बाहेर पडाल.’ मी १९९८ पासून भाजपचाच सदस्य होतो. २००५ मध्ये डाव्या पक्षांचे तत्कालीन सरकार हटवण्यासाठी मी तृणमूलमध्ये सहभागी झालो. आता पुन्हा भाजपत आलो आहे. यंदा नंदीग्राममध्ये कमळ फुलवण्याची जबाबदारी माझी आहे.’

माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी भाजपत, आज मिथुनचा प्रवेश
माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनीही शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्रिवेदींनी काही दिवसांपूर्वीच राज्यसभा आणि तृणमूलच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, कोलकात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अभिनेते मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...