आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी(आज)सकाळी 10:50 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी एक चकीत करणारी घटना घडली. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी यावेळी ममता बॅनर्जींना राज्यातील हिंसा बंद झाल्या पाहिजे, अशा सूचना दिल्या. यावर ममता म्हणाल्या की, आतापर्यंत राज्यातील व्यवस्था निवडणूक आयोगाच्या हातात होती, आता मी आल्यानंतर नवीन व्यवस्था लागू करेल. यावेळी फक्त ममता यांनीच मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या कॅबिनेटमधील इतर मंत्री 6 किंवा 7 मे रोजी शपथ घेऊ शकतात.
बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसेवर सीएम आणि राज्यपालांनी व्यक्त केले मत
ममता शपथविधीनंतर म्हणाल्या की, आमची प्राथमिकता कोविडविरोधातील लढाईला जिंकण्याची आहे. राज्यातील हिंसेवर त्या म्हणाल्या की, राज्यातील जनतेला हिंसा आवडत नाही. हिंसाचार घडवणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही. यापुढे हिंसेची घटना घडली नाही पाहिजे. राज्यपाल जगदीश धनखडदेखील म्हणाले- आशा करतो की, ममता बॅनर्जी संविधानाचे पालन करतील. राज्यात कायदा सुव्यवस्था लागू व्हावी.
तिसऱ्यांदा मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी राज्यात तिसऱ्यांना मुख्यमंत्री बनत आहेत. परंतु, स्वतः ममता बॅनर्जी नंदीग्राममधून निवडणूकीत पराभूत झाल्या आहेत. यामुळे येत्या सहा महिन्यात त्यांना दुसऱ्या कुठल्यातरी मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागेल. यापूर्वी ममतांनी 20 मे 2011 ला पहिल्यांदा आणि 27 मे 2016 ला दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
काँग्रेस आणि डाव्यानंतर सर्वाधिक काळ सत्तेत
बंगालने 1950 पासून 17 वर्षे सत्ता काँग्रेसच्या हाती दिली. पण, 1977 मध्ये राज्यातील जनतेने डाव्यांना निवडले. यानंतर डाव्यांनी राज्यात तब्बल 34 वर्षे राज्य केले. लेफ्टने CPM च्या नेृत्वात राज्य सांभाळले. यानंतर, ममतांच्या नेतृत्वात तृणमूल सत्तेत आली आणि मागील दहा वर्षांपासून ममता बॅनर्जी बंगाल सांभाळत आहेत. आता ही त्यांची तिसरी टर्म आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.