आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तर प्रदेशातील बलियामध्ये गुरुवारी पोलिस अधिकारी आणि एसडीएमसमोर एका तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. प्रकरण दुर्जनपूरच्या बैरियाचे आहे. येथे दोन दुकानांचा वाद सोडवण्यासाठी सीओ चंद्रकेश सिंह, बीडीओ बैरिया गजेंद्र प्रताप सिंह आणि एसडीएम सुरेश पाल आले होते. धीरेंद्र सिंह आणि जयप्रकाश उर्फ गामा पाल यांच्या दुकानाचा वाद सुरू होता.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी धीरेंद्रने जयप्रकाशच्या छातीत 4 गोळ्या मारल्या आणि फरार झाला. या घटनेत जयप्रकासचा जागीच मृत्यू झाला. धीरेंद्र बैरियाचे भाजप आमदार सुरेंद्र सिंहच्या जवळचा असल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून या घटनेचा व्हिडिओ ट्वीट करुन निषेध व्यक्त होत आहे.
वाद मिटवण्यासाठी पंचायत झाली, अधिकारीदेखील आले होते
ग्रामसभा दुर्जनपूर व हनुमानगंजच्या दोन कोट्यांच्या दुकानांच्या पंचायत भवन येथे बैठक बोलविण्यात आली होती. एसडीएम बैरिया सुरेश पाल, सीओ बैरिया चंद्रकेश सिंह, बीडीओ बैरिया गजेंद्र प्रताप सिंहसोबत रेवती पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारीदेखील याठिकाणी आले होते. दुकानांसाठी चार स्वयं सहाय्यता समुहांनी अर्ज केला होता.
दुर्जनपूरच्या दुकानांसाठी दोन गटांमध्ये मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले, मतदान किंवा इतर ओळखपत्र असलेल्या व्यक्तीलाच मतदान करता येईल. एका समुहाकडे कोणतेच ओळखपत्र नव्हते, यावरुनच वाद सुरू झाला.
वाद वाढल्यानंतर लाठ्या-काठ्या आणि दगडफेक झाली
वाद वाढल्यानंतर लाठ्या-काठ्या आणि दगडफेक करण्यात आली. यादरम्यान एका गटाकडून गोळीबार करण्यात आला. दुर्जनपूरचे जयप्रकाश उर्फ गामा पाल यांना धीरेंद्रने चार गोळ्या मारल्या. या घटनेत जयप्रकाशचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील तणाव वाढल्यानंतर पोलिसांचा मोठा फौज फाटा बोलवण्यात आला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.