आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मन की बात:तिरंग्याच्या अवमानामुळे देश दु:खी, दिल्लीतील हिंसाचाराचा मोदींकडून उल्लेख

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार, शेतकऱ्यांत पुढील चर्चा होणार 2 फेब्रुवारीला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नववर्षातील पहिल्या “मन की बात’मध्ये दिल्लीत २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, “या दिवशी तिरंग्याच्या झालेल्या अवमानामुळे देश दु:खी आहे. आगामी काळात नव्या आशा-उमेदीने पुढे जावयाचे आहे.’ लसीकरणाबाबत ते म्हणाले, “जगातील सर्वात मोठ्या या माेहिमेत भारताने १५ दिवसांत ३० लाखांहून अधिक वॉरियर्सना डोस दिला. अमेरिकेस एवढ्या लसीकरणासाठी १८, तर ब्रिटनला ३६ दिवस लागले. “मेड इन इंडिया’ लस ही आत्मसन्मानाचे प्रतीक आहे.’ दरम्यान, शेतकरी व सरकारदरम्यान २ फेब्रुवारीला चर्चा होत आहे.

रामायणावरील पेंटिंग २ लाखांचे
मी बंगालच्या पिंगला गावात चित्रकार शमिनुद्दीन यांचा व्हिडिओ पाहिला. त्यांनी रामायणावर केलेले पेंटिंग २ लाखांत विकले गेले. यामुळे गावकरीही खुश झाले. यातून बंगालशी संबंधित चांगल्या गोष्टी कळाल्या. पर्यटन विभागानेही या महिन्यात इन्क्रेडिबल इंडियाची सुरुवात येथे केली.

... आता माघार नाहीच : बादल
किसान आंदोलनामुळे सिंघू बॉर्डरला किल्ल्याचे स्वरूप आहे. गाझीपूर, टिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. अकाली नेते सुखबीरसिंग बादल यांनीही शेतकऱ्यांनी माघार घेऊ नये, असे आवाहन केले.

सरकारने सशर्त चर्चा करू नये, तरच पंतप्रधानांची प्रतिष्ठा टिकून राहील
तिरंग्याचा संपूर्ण देश सन्मान राखतो. ज्यांनी अवमान केला त्यांना अटक करा. सरकारने सशर्त चर्चा करू नये. यामुळे शेतकऱ्यांची पगडी आणि पंतप्रधानांचा सन्मान टिकून राहील.’ - राकेश टिकैत

... तर तेल डेपोची टाळेबंदी
शहाजहांपूर (अलवर)| हरियाणा-राजस्थान सीमेवर निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे हायवे बंद आहे. त्यामुळे व्यापारावर परिणाम होत आहे. त्यामुळे या भागातील ८४ गावपंचायतींनी रेवाडी तेल डेपोची टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला.

आधुनिक शेतीसाठी कटिबद्ध
मोदी म्हणाले, उत्तर प्रदेशात स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल सुरू झाला. बुंदेलखंडात स्ट्रॉबेरी पाहून लोकांना आश्चर्य वाटले. लॉ ग्रॅज्युएट गरुलिन चावलाने अगोदर घरी अन् नंतर शेतीत स्ट्रॉबेरी उत्पादन घेऊन झांशीत हे उत्पादन होऊ शकते हे दाखवून दिले. डांेगरांत पिकणारी स्ट्रॉबेरी आता कच्छच्या वाळवंटातही उगवत आहे.

बातम्या आणखी आहेत...