आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Man Ki Bat : Prime Minister Modi Says Toy Industry Has A Big Role To Play In A Self reliant India, It Is A Confidence Building Movement

मन की बात:चीन लक्ष्य... उद्योजकांनी भारताला खेळण्यांचे हब घडवावे : मोदी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा ‘लोकलसाठी व्होकल’ होण्यावर भर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वावलंबनाचा मंत्र : भारतीयांनी कॉम्प्युटर गेम्स विकसित करावे
  • कौतुक : उत्सवाचा काळ आहे, मात्र लोक शिस्तही पाळत आहेत
  • बीड पोलिसांच्या श्वानपथकातील रॉकीचा गौरवपूर्ण उल्लेख

जगात खेळण्यांची बाजारपेठ सुमारे ७ लाख कोटींची असली तरी यात भारताचा वाटा अत्यंत कमी आहे. रेडिओवर ६८व्या “मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वास्तव्य मांडताना लोकलसाठी व्होकल होण्यावर पुन्हा एकदा भर दिला. मोदी म्हणाले, “स्टार्टअप मित्र आणि नव्या उद्योजकांनी या क्षेत्रात पाऊल टाकून देशाला खेळण्यांचे हब घडवावे, जेणेकरून बाहेरून खेळण्या मागण्याची वेळ येऊ नये.’ मोदींचे हे आवाहन म्हणजे चीनविरुद्ध उचलल्या जाणाऱ्या नव्या पावलाचे संकेत मानले जात आहेत. खेळण्यांच्या भारतीय बाजारपेठेत चीनचा मोठा वाटा आहे. मोबाइल गेम्स आणि अॅपमध्ये स्वावलंबी होण्याचे आवाहन करताना मोदींनी चंपारणमधील आदिवासींचे ६० तासांचे लॉकडाऊन, आपत्ती व्यवस्थापन आणि बचावकार्यात देशी श्वानांच्या भूमिकेचे कौतुक केले. दरम्यान, राहुल गांधी यांनी ट्वीट करून टीका केली. ते म्हणाले, “जेईई-नीटसारखे विषय सोडून पंतप्रधानांनी खेळण्यांवर चर्चा केली.’

स्वावलंबनाचा मंत्र : भारतीयांनी कॉम्प्युटर गेम्स विकसित करावे

मोदी म्हणाले, सध्या कॉम्प्युटर गेम्सचा खूप ट्रेंड आहे. युवकांनी देशी गेम्स बनवावेत. यानंतरचे ट्विटर, फेसबुक, भारतातील असावेत अशी इच्छा आहे. स्वावलंबी भारत अॅप इनोव्हेशन चॅलेंजअंतर्गत देशात तयार मोबाइल अॅपला बक्षीस देण्यात आले. दोन तृतीयांश छोट्या शहरातील होते. २४ अॅपला पुरस्कार मिळाले. यात किड्स लर्निंग अॅप, चिंगारी अॅप, आस्क सरकारसारखे अॅप आहेत.

धैर्य : कोरोना काळात शेतकऱ्यांनी केली गेल्या वर्षापेक्षा जास्त पेरणी

मोदी म्हणाले, शेतकऱ्यांनी कोरोनाच्या कठीण स्थितीत गेल्या वर्षाच्या तुलनेत ७% जास्त पेरणी केली. भाताची लावणी १०%, डाळी ५%, कापूस ३% जास्त लावला. शेतकऱ्यांच्या धैर्याला नमन.

कौतुक : उत्सवाचा काळ आहे, मात्र लोक शिस्तही पाळत आहेत

हा काळ उत्सव अन् सणासुदीचा आहे. या कोरोना संकटात लोकांमध्ये उत्साह असला तरी शिस्तही आहे. देशातील उत्सवात जसा संयम व साधेपणा दिसत आहे तो अभूतपूर्व आहे.

जबाबदारी : नवे शिक्षण धोरण विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचे काम शिक्षकांचे

शिक्षक दिनाबाबत बोलताना मोदींनी शिक्षणात तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला. ते म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरणाद्वारे बदल होताहेत. २०२२ मध्ये स्वातंत्र्याला ७५ वर्षे होतील. विद्यार्थी ७५ नायकांवर लिहितील. सप्टेंबर पोषण महिना असेल. गुणपत्रिकांप्रमाणे पोषण कार्ड सुरू केले जात आहे.

आदर्श : थारू आदिवासींचा ६० तासांचा लॉकडाऊन पर्व

सणांमध्ये पर्यावरण व निर्सगासोबत सहजीवनाचा संदेश आहे. चंपारणमध्ये थारू आदिवासी ६० तासांचा लॉकडाऊन पाळतात. या वेळी कोणी गावात येत नाही, बाहेर निघतही नाही.

देशीवर भर : भारतीय वंशाचे श्वानही चांगले असतात

मोदी म्हणाले, भारतीय वंशाचे मुधोळ हाउंड, हिमाचली हाउंड खूप चांगले आहेत. राजापलायम, कन्नी, चिप्पीपराई, कोंबाईही शानदार श्वान आहेत. त्यांचा खर्चही कमी आहे.

गौरव : बीड पोलिसांच्या श्वानपथकातील रॉकीचा गौरवपूर्ण उल्लेख

बीड येथील पोलिस दलाच्या श्वानपथकातील ‘रॉकी’ या श्वानाचा आजाराने मृत्यू झाला होता. बीड पोलिसांनी ‘रॉकी’ला सलामी देत सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढून भावपूर्ण निरोप दिला होता. या भावुक प्रसंगाचा पंतप्रधान मोदी यांनी या वेळी विशेष उल्लेख केला. या वेळी त्यांनी ‘रॉकी’ने बजावलेल्या कर्तव्याबद्दल गौरवोद्गार काढले. श्वानपथकात ‘रॉकी’ ८ वर्षांपासून कार्यरत होता.