आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीने मुलाच्या मदतीने केले पतीचे 6 तुकडे:बंगालमधील खळबळजनक घटना, करवताने कापलेले तुकडे वेगवेगळ्या भागांत फेकले

कोलकाता10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडासारखीच एक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. बंगालमध्ये पत्नीने आपल्या मुलाच्या मदतीने पतीची हत्या केली. एवढेच नाही तर हत्येनंतर त्याचे 6 तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. घटना 12 नोव्हेंबरचे आहे. त्याचा खुलासा 15 नोव्हेंबर रोजी पती व मुलगा हरवल्याची तक्रार करण्यासाठी पोलिसांत गेल्यानंतर झाला.

वडिलांनी 3 हजार रुपये न दिल्याने हत्या

बरुईपूर पोलिसांच्या माहितीनुसार, मृत 55 वर्षीय उज्ज्वल चक्रवर्ती माजी नौदल कर्मचारी होते. पत्नी व मुलाने ते नेहमीच आपला छळ करत असल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वीच मुलाने एका परीक्षेसाठी वडिलांकडे 3 हजार रुपयांची मागणी केली. पण त्यांनी ते देण्यास नकार दिला.

यामुळे झालेल्या वादात वडिलांनी मुलाच्या कानशिलात भडकावली. त्यानंतर मुलाने वडिलांना धक्का दिला. त्यात ते खुर्चीला धडकल्यामुळे बेशुद्ध झाले. त्यानंतर मुलाने गळा आवळून त्यांची हत्या केली.

कारपेंटर मुलाने करवताने केले वडिलांचे तुकडे

आरोपी मुलगा पॉलिटेक्निकमध्ये फर्नीचर क्राफ्टचे शिक्षण घेतो. त्याने सांगितले की, हत्येनंतर वडिलांना बाथरूममध्ये नेले. त्यानंतर कारपेंटर किटने हॅकसॉच्या (करवत) मदतीने त्यांच्या शरीराचे 6 तुकडे केले.

तो हे तुकडे फेकण्यासाठी सायकलवर जात होता. वडिलांचे अवयव त्याने 6 वेळा बाहेर जावून 500 मीटर अंतरावरील खास मल्लिक व देहिमेदन माल्ला भागात फेकले. पोलिसांनी सांगितले की, त्यांचे 2 पाय मल्लिकच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले. तर डोके व पोट देहिमदान मल्लातील एका तलावातून बाहेर काढण्यात आले. उर्वरित अवयवांचा शोध घेतला जात आहे.

हरवल्याच्या तक्रारीनंतर झाला खुलासा

आई-मुलगा 15 नोव्हेंबर रोजी पोलिसांकडे वडील हरवल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. पोलिसांनी दोघंची चौकशी केली असता, त्यांना त्यांचे बोलणे संशयास्पद वाटले. त्यानंतर पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी वडिलांची हत्या केल्याचे कबूल केले. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...