आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO,हनुमानाचा रोल करणाऱ्या तरुणाचा स्टेजवर मृत्यू:गणेशोत्सवात रामभजनावर डान्स करताना कोसळला, पुन्हा उठलाच नाही

मैनपुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशाच्या मैनपुरीत गणेशोत्सवात हनुमानाचा रोल करणाऱ्या एका तरुणाचा स्टेजवरच मृत्यू झाला. तो रामभजनावर डान्स करत होता. नाचताना तो अचानक कोसळला. त्यानंतर पुन्हा उठलाच नाही.

प्रारंभी दर्शकांना हा युवक अॅक्टिंग करत असल्याचे वाटले. पण अनेक मिनिटांपर्यंत तो उठला नसल्यामुळे त्यांनी स्टेजवर धाव घेतली. त्याची शुद्ध हरपली होती. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे त्यांनी सांगितले. अवघ्या 35 वर्षांच्या या तरुणाचे नाव रवी शर्मा असे होते.

हे छायाचित्र रवी शर्मा यांचे आहे. तो मागील 15 वर्षांपासून रामलीलेत हनुमानाचा रोल करत होता. त्याला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता.
हे छायाचित्र रवी शर्मा यांचे आहे. तो मागील 15 वर्षांपासून रामलीलेत हनुमानाचा रोल करत होता. त्याला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता.

रवी डान्स करताना अस्वस्थ दिसला

डान्स करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूशी संबंधित 2 व्हिडिओ उजेडात आलेत. एक व्हिडिओ 45 सेकंदांचा आहे. त्यात हनुमानाचा पेहराव घातलेला युवक स्टेजवर हळूवार डान्स करताना दिसून येत आहे. काही मिनिटे डान्स केल्यानंतर तो अचानक अस्वस्थ झाल्याचे दिसतो. तो स्टेजवरून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. तोंडाला हात लावतो. त्यानंतर अचानक कोसळतो. तर दुसरा व्हिडिओ त्याला रुग्णालयात नेतानाचा आहे.

कार्यक्रमात नाचताना रवी शर्मा अचानक कोसळला. लोकांना वाटले की तो अॅक्टिंग करत आहे.
कार्यक्रमात नाचताना रवी शर्मा अचानक कोसळला. लोकांना वाटले की तो अॅक्टिंग करत आहे.

15 वर्षांपासून रामलीलामध्ये करत होता हनुमानाचा रोल

ही घटना शनिवारी रात्री बंशी गोहरा भागात घडली. स्थानिकांच्या मते, रवी शर्मा रामलीला व अन्य उत्सवांत मागील 15 वर्षांपासून हनुमानाचा रोल करत होता. आसपासच्या भागात रामलीला आयोजित करताना त्याला नेहमीच बोलावण्यात येत होते. त्याला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता.

व्हिडिओत त्याला काहीतरी झाल्याचे दिसून येत होते. तो स्टेजवरून परत फिरत होता. पण अचानक कोसळला.
व्हिडिओत त्याला काहीतरी झाल्याचे दिसून येत होते. तो स्टेजवरून परत फिरत होता. पण अचानक कोसळला.

मैनपुरीमध्ये केली होती देखाव्याची सुरूवात

रवी शर्मा मैनपुरीच्या राजा बागेत कुटुंबासह राहत होता. त्याने मैनपुरीतून देखाव्याची सुरूवात केली होती. त्यामुळे त्याला लोक 'झांकी गुरू' म्हणूनही ओळखत होते. रवीला 2 भाऊ आहेत. मागील 15 ते 20 वर्षांपासून भजन संख्या, कीर्तन, देवी जागरण सारख्या कार्यक्रमांत अभिनय करत होता.

डान्स करताना हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाल्याची उत्तर प्रदेशातील 3 दिवसांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी बरेलीत गुरूवारी रात्री मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत डान्स करताना 45 वर्षीय प्रभात कुमार नामक व्यक्तीचा मृत्यू झाला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभात यांनाही हृदयाशी संबंधित कोणताही आजार नव्हता.

बातम्या आणखी आहेत...