आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Man Tries To Drive Into National Security Adviser Ajit Dovals Residence, Man Taken Into Custody

मोठी बातमी:अजित डोभाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न, आरोपीला बेड्या; म्हणाला - बॉडीमध्ये चिप आहे, रिमोटने चालतोय

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या घरात एक संशयित घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. सुरक्षारक्षकांनी या संशयिताला पकडले. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकासोबत चौकशीदरम्यान त्याने सांगितले की त्याच्या शरीरात एक चिप आहे, ती रिमोटने नियंत्रित केली जात आहे. तपासात तो कर्नाटकचा रहिवासी असल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7.45 च्या सुमारास त्या व्यक्तीने अजित डोभाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी योग्य वेळी त्या व्यक्तीला थांबवून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे समजते. सध्या चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडल्यानंतर तो माणूस थोडा बडबडत होता. त्याच्या शरीरात कोणीतरी चिप घातली असून ती रिमोटने नियंत्रित केली जात असल्याचे तो सांगत होता. मात्र, तपासात त्याच्या शरीरातून कोणतीही चिप सापडलेली नाही.

घुसखोरी करणाऱ्याचे नाव शांतनु रेड्डी

ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती कर्नाटकातील बेंगळुरू येथील रहिवासी आहे. शांतनु रेड्डी असे व्यक्तीचे नाव सांगण्यात आले आहे. नोएडाहून लाल रंगाची एसयूव्ही कार भाड्याने घेऊन तो डोवाल यांच्या घरी पोहोचला होता. रेड्डी कार मध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असताना पकडला गेला. सध्या पोलिस रेड्डीचा तिथे येण्यामागचा हेतू काय होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

बातम्या आणखी आहेत...