आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोकाट बैलाने घेतला वृद्धाचा बळी:अनेकदा खुराखाली तुडवून घेतले प्राण, शिंगेही खूपसली, गुजरातच्या जामनगरातील घटना

जामनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या जामनगर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रस्त्यांवर फिरणाऱ्या एका मोकाट बैलाने (वळू) एका वृद्धाला ठार केले. ही संपूर्ण घटना घटनास्थळाजवळील एका घरावर लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली. त्यात बैलाने वृद्धाला किती निर्दयीपणे खुराखाली तुडवले हे दिसून येते. गंभीर जखमी या वृद्धाला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.
डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.

अनेकदा तुडवले, शिंगे खूपसली

जामनगर शहराच्या चंडी मार्केट भागात राहणारे भरभाई जेठालाल बोसमिया सामान आणण्यासाठी बाजारात जात होते. त्यावेळी रस्त्याने मोकाट फिरणाऱ्या वळूने त्यांच्यावर हल्ला चढवला. बैलाने शिंग मारल्याने ते जमीनवर पडले. त्यानंतर बैलाने त्यांना अनेकदा खुराखाली तुडवले व शिंगे खूपसली. भरतभाई बेशुद्ध झाल्यानंतरच बैलाने त्यांना सोडले.

बैलाने शिंगे मारल्यामुळे वृद्धाच्या छातीत खोलवर जखमा झाल्या होत्या.
बैलाने शिंगे मारल्यामुळे वृद्धाच्या छातीत खोलवर जखमा झाल्या होत्या.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाला मृत्यू

भरभाईंना शुद्ध हरपल्याच्या स्थितीत रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच बैलाने तुडवल्यामुळे त्यांच्या छातीतही खोलवर जखमा झाल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...