आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Seat Belt Beep System For Rear Seats To Be Introduced, Notification For Rear Seat Belt Mandate Soon: Nitin Gadkari

केंद्र सरकारचा विचार:मागील सीटवरही सीट बेल्ट अलार्म बंधनकारक करणार, सायरस मिस्त्री अपघाती मृत्यूनंतर मुद्दा ऐरणीवर

मुंबई, नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गडकरी म्हणाले, प्रचंड वाहतुकीमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग धोकादायक

कारच्या मागील सीटवरही सीट बेल्ट अलार्म लावणे अनिवार्य करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. त्यासाठी कार उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तसे संकेत दिले आहेत. सध्या केवळ पुढील सीटवर बसलेल्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर अलार्म सिस्टिम बसवणे कार निर्मात्या कंपन्यांसाठी अनिवार्य आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूमुळे यापुढे गाडीमधील मागील सीटवरही सीट बेल्ट बीप सिस्टीम लावण्यात यावी असा निर्णय सरकारने घेतला आहे,अशी माहिती गडकरी यांनी दिली. मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नसल्यास केंद्रीय मोटर वाहन कायद्यातील कलम १३८ (३) नुसार १ हजार रुपयांचा दंड निर्धारित आहे. तथापि,अनेक लोकांना हा नियम माहिती नाही अथवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. केंद्राच्या एका अहवालानुसार सन २०२० मध्ये सीट बेल्ट लावला नसल्याने अपघातात १५,१४६ लोक मृत्यूमुखी पडले तर ३९,१०२ जखमी झाले होते.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग धोकादायक : मुंबई-अहमदाबाद महामार्ग धोकादायक असून या महामार्गावर ट्रॅफिक व्हॉल्यूम १.२५ लाख पॅसेंजर कार युनिट ( पीसीयू ) आहे. त्यामुळे वाहनांची टक्कर होण्याची भीती अधिक असते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. २० हजार किंवा त्यापेक्षा अधिक पीसीयू असल्यास वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सहापदरी महामार्गाची गरज असते, असे गडकरी म्हणाले. टाटा समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री आणि अन्य एकाचा रविवारी पालघर जिल्ह्यात याच महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. सूर्या नदीजवळील पुलावर रस्ता दुभाजकाला कार धडकल्याने हा अपघात झाला होता. सायरस मिस्त्री यांच्यावर मंगळवारी मुंबई येथे वरळीत पारशी परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

जगातील सर्वात धोकादायक रस्त्यांमध्ये मुंबई -अहमदाबाद महामार्ग : सायरस मिस्री यांच्या मृत्यूनंतर भारताली रस्त्यांची दुर्दशा पुन्हा ठळकपणे समोर आली आहे. जागतिक बँकेने तर मुंबई -अहमदाबाद महामार्ग जगातील सर्वात धोकादायक रस्ता म्हणून चिन्हांकित केला आहे. ब्लूमबर्ग अहवालानुसार भारतात ५०.८९ लाख किमी रस्ते असून रस्त्यांचे हे जाळे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आहे. परंतु रस्त्यांचे अत्यंत दर्जाहीन बांधकाम आणि देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष यामुळे अपघात होतात. कोरोनापूर्वी भारतात दर ४ मिनीटाला अपघात होत होते. स्टॅनफोर्ड सामाजिक संशोधन आढाव्यानुसार सन २०२० मध्ये भारतात ३६ लाख रस्ते अपघात झाले. त्यात १३ लाख लोक मृत्युमुखी पडले.

ब्लॅक स्पॉटवर तीन वर्षांत ८० हजारांपेक्षा अधिक अपघात आल्या आहेत. हे ब्लॅक स्पॉट शक्य तितक्या लवकर हटवण्यासाठी अथवा त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयांवर सोपवण्यात आली आहे, असे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. राष्ट्रीय महामार्गाचे िडझाइन, बांधकाम आणि आॅपरेशनचे परीक्षण केले जात आहे. त्या ठिकाणी सूचना फलक, वाहतूक चिन्हे लावली.

मागील सीटवरही सीट बेल्ट बीप सिस्टीम लावण्यात यावी असा निर्णय सरकारने घेतला आहे,अशी माहिती गडकरी यांनी दिली. मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नसल्यास केंद्रीय मोटर वाहन कायद्यातील कलम १३८ (३) नुसार १ हजार रुपयांचा दंड निर्धारित आहे. तथापि,अनेक लोकांना हा नियम माहिती नाही अथवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. केंद्राच्या एका अहवालानुसार सन २०२० मध्ये सीट बेल्ट लावला नसल्याने अपघातात १५,१४६ लोक मृत्यूमुखी पडले तर ३९,१०२ जखमी झाले होते.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग धोकादायक मुंबई-अहमदाबाद महामार्ग धोकादायक असून या महामार्गावर ट्रॅफिक व्हॉल्यूम १.२५ लाख पॅसेंजर कार युनिट ( पीसीयू ) आहे. त्यामुळे वाहनांची टक्कर होण्याची भीती अधिक असते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. २० हजार किंवा त्यापेक्षा अधिक पीसीयू असल्यास वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सहापदरी महामार्गाची गरज असते, असे गडकरी म्हणाले. टाटा समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री आणि अन्य एकाचा रविवारी पालघर जिल्ह्यात याच महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. सूर्या नदीजवळील पुलावर रस्ता दुभाजकाला कार धडकल्याने हा अपघात झाला होता. सायरस मिस्त्री यांच्यावर मंगळवारी मुंबई येथे वरळीत पारशी परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

जगातील सर्वात धोकादायक रस्त्यांमध्ये मुंबई -अहमदाबाद महामार्ग सायरस मिस्री यांच्या मृत्यूनंतर भारताली रस्त्यांची दुर्दशा पुन्हा ठळकपणे समोर आली आहे. जागतिक बँकेने तर मुंबई -अहमदाबाद महामार्ग जगातील सर्वात धोकादायक रस्ता म्हणून चिन्हांकित केला आहे. ब्लूमबर्ग अहवालानुसार भारतात ५०.८९ लाख किमी रस्ते असून रस्त्यांचे हे जाळे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आहे. परंतु रस्त्यांचे अत्यंत दर्जाहीन बांधकाम आणि देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष यामुळे अपघात होतात. कोरोनापूर्वी भारतात दर ४ मिनीटाला अपघात होत होते. स्टॅनफोर्ड सामाजिक संशोधन आढाव्यानुसार सन २०२० मध्ये भारतात ३६ लाख रस्ते अपघात झाले. त्यात एकूण १३ लाख लोक मृत्युमुखी पडले. मिस्त्री यांच्या कारमधील चिप तपासणीसाठी जर्मनीला पाठवणार सायरस मिस्त्री यांच्या कारमधील चिपची तपासणी करण्यासाठी ती जर्मनीला पाठवण्यात येणार आहे. अपघाताची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी कार कंपनी मर्सिडीजला अनेक प्रश्न विचारले आहेत. त्याची तपासणी करण्याच्या दृष्टीने गाडीमधील डेटा रेकाॅर्डर चिपमधील माहिती मिळवण्यासाठी ती डिकोड करावी लागणार असून त्यासाठी चिप जर्मनीला पाठवली जाणार आहे. दरम्यान, मिस्री यांच्या अपघाताच्या चौकशीत पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करीत असल्याची माहिती मर्सिडीझ बेंझ इंडियाने दिली आहे.

ब्लॅक स्पॉटवर तीन वर्षांत ८० हजारांपेक्षा अधिक अपघात पवनकुमार | नवी दिल्ली | रस्त्याचे डिझाइन, वाहतूक चिन्हे आणि इतर त्रुटींमुळे देशातील राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात ब्लॅक स्पॉट आहेत. या ब्लॅक स्पॉटवर तीन वर्षांत ८० हजारांपेक्षा अधिक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. तथापि, ५८ टक्क्यांपेक्षा अधिक ब्लॅक स्पॉटवरील जवळपास सर्वच अडथळे, समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केला आहे. उर्वरित ब्लॅक स्पॉटवरही तात्पुरत्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. हे ब्लॅक स्पॉट शक्य तितक्या लवकर हटवण्यासाठी अथवा त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयांवर सोपवण्यात आली आहे, असे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. राष्ट्रीय महामार्गाचे िडझाइन, बांधकाम आणि आॅपरेशनचे परीक्षण केले जात आहे. त्या ठिकाणी सूचना फलक, वाहतूक चिन्हे लावली.

ब्लॅक स्पॉट म्हणजे काय ? राष्ट्रीय महामार्गावर ५०० मीटर्सच्या परिघात तीन वर्षांत पाच अपघात आणि या अपघातांमध्ये १० पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडल्यास त्या ठिकाणास ब्लॅक स्पॉट म्हटले जाते. सन २०१६ ते १८ या कालावधीत राष्ट्रीय महामार्गांवरील ब्लॅक स्पॉटवरच ८०,४९५ रस्ते अपघात झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...