आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mandsaur Muslim Hinduism | Madhya Pradesh Muslim Man Converts To Hinduism | Marathi News

शेण, गोमूत्राने स्नान करून मुस्लिम व्यक्ती झाली हिंदू:मंदसौरच्या पशुपतीनाथ मंदिरात धर्मांतर; म्हणाले- राजपूत हे मुस्लिमांचे पूर्वज

मंदसौर / दीपक शर्मा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदसौर येथील एका व्यक्तीने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. शेख जफर शेख पिता गुलाम मोईनुद्दीन शेख आता चेतन सिंग राजपूत या नावाने ओळखले जातील. पत्नी आधीपासूनच हिंदू धर्माची आहे. शुक्रवारी त्यांनी भगवान पशुपतीनाथ मंदिराच्या प्रांगणात धर्म परिवर्तन केले. 46 वर्षीय शेख यांना महामंडलेश्वर स्वामी चिदंबरानंद सरस्वती यांच्या हस्ते विधीवत पूजा करून हिंदू धर्माची दीक्षा देण्यात आली. यावेळी त्यांना शेण आणि गोमुत्राने स्नानही घालण्यात आले.

हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर ते म्हणाले - ही घरवापसी आहे. लहानपणापासूनच माझा हिंदू धर्माकडे कल होता, म्हणूनच मी हिंदू मुलीशी लग्न केले. आतापर्यंत मी स्वतःला अपूर्ण समजत होतो, पण आता हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर मी पूर्ण हिंदू झालो आहे. यामुळे मला शांतता वाटत आहे. यावेळी खासदार सुधीर गुप्ता आणि आमदार यशपाल सिंह सिसोदिया यांनीही मंदिरात पोहोचून त्यांना घरी परतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आमदार सिसोदिया मंदिरातच उपस्थित होते.

दिव्य मराठीचे रिपोर्टर दीपक शर्मा यांनी हिंदू धर्म स्वीकारलेल्या चेतन सिंग राजपूत यांच्याशी साधला संवाद...
पत्रकार : आज तुम्ही धर्मांतर केले, याचे कारण काय?
चेतन:
घरवापसी केली आहे, परिवर्तनाचा प्रश्नच नाही. संपूर्ण विश्वातील सर्व लोक सनातनी आहेत, ज्यांचे धर्मांतर होऊन इकडे-तिकडे स्थलांतर झाले आहे. जे इकडे तिकडे भटकत आहेत, त्यांनी धैर्य दाखवावे आणि त्यांच्या मूळ शाश्वत जीवनाकडे परत यावे, कारण इथेच शांती मिळेल.

पत्रकार : घरच्यांनी विरोध केला नाही?
चेतन
: मी सुरुवातीपासून सनातन धर्माचे पालन करतो. माझ्या घरात देवघर आहे, घरातील कोणीही कधी विरोध केला नाही. प्रत्येकजण साधा-सरळआहे, कोणीही कट्टर नाही.

पत्रकार : तुम्ही हिंदू मुलीशी प्रेमविवाह केला होता, हे कारण आहे का?
चेतन:
मी हिंदू मुलगी शारदासोबत प्रेमविवाह केला कारण मी सनातन धर्माचे पालन करतो. जर मी मुस्लिम मुलीशी लग्न केले असते तर तीने मला पूजा करू दिली नसती. अशा परिस्थितीत त्याचा तिला आणि मलाही त्रास झाला असता. म्हणूनच मी सर्वकाही विचारपूर्वक केले.

पत्रकार : राजपूतच का...?
चेतन:
जे मुस्लिम आहेत, त्यांचे पूर्वज राजपूत होते. त्यामुळे हे नाव निवडण्यात आले.

पत्रकार : मुस्लिम समाजातून निषेधाचा आवाज उठला तर तुम्ही काय कराल?
चेतन :
देशाच्या घटनेनुसार प्रत्येकाला आपल्या स्वेच्छेने कोणत्याही धर्मावर श्रद्धा ठेवता येते. यात कोणाला काही अडचण नसावी आणि असेल तर ती कट्टरता आहे. जे कट्टर आहेत ते विरोध करतील. जे शहाणे आहेत ते विरोध करणार नाहीत. त्यांनी विरोध केला तर तो चुकीचा आहे, हा तर श्रद्धेचा विषय आहे.

पत्रकार : तुम्ही सनातन धर्माचे पालन करत होता, मग आज याची गरज काय होती?
चेतन
: कुठेतरी मी स्वतःला अपूर्ण समजत होतो, मी एका जागी बसू शकलो नाही, आज मी पूर्ण झालो आहे. आता धर्मांतर केल्यानंतर मी पूर्ण हिंदू आहे आणि परम शिवभक्तही आहे.

ते सुरुवातीपासूनच शिवभक्त होते : आमदार
पंचायती आखाडा महानिर्वाणीचे महामंडलेश्वर स्वामी चिदंबरानंद सरस्वती म्हणाले- आज त्यांना त्यांच्या इच्छेनुसार नवीन नाव देऊन घरवापसी करण्यात आली आहे. सर्व प्रक्रिया योग्यप्रकारे केल्या आहेत. आमदार यशपाल सिंह सिसोदिया म्हणाले- ते पहिल्यापासूनच शिवभक्त आहेत. कालपर्यंत तो जफर शेख होता, आता तो चेतन या नावाने ओळखला जाईल. नावाबरोबरच संस्कृती आणि विचारात बदल झाला आहे. त्याने एक नवी सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...