आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळुरूतील ऑटो ब्लास्टमागे अतिरेक्यांचा हात:ऑटोतील बॅगमध्ये बॉम्ब असल्याची शंका; DGP म्हणाले- त्यांचा हेतू धोकादायक होता

बंगळुरू15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकच्या मंगळुरूत शनिवारी ऑटो रिक्षात झालेल्या स्फोटांमागे अतिरेकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकच्या डीजीपींनी रविवारी सांगितले की, हा एक सामान्य स्फोट नसून, अतिरेकी हल्ला होता. स्फोटामुळे जास्त नुकसान झाले नाही. पण हा हल्ला मोठे नुकसान करण्याच्या हेतूने करण्यात आला होता.

मंगळुरूमध्ये शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास एका ऑटोत रिक्षात स्फोट झाला होता. त्यात 2 जण जखमी झाले होते. कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र रविवारी म्हणाले की, ही घटना अतिरेकी कृत्य असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राज्य पोलिस आता केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत.

स्फोटानंतर पोलिस ऑटो रिक्षाची पाहणी करून आरोपींविरोधात पुरावे शोधत आहेत.
स्फोटानंतर पोलिस ऑटो रिक्षाची पाहणी करून आरोपींविरोधात पुरावे शोधत आहेत.

बॅगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा संशय

मंगळुरूच्या कांकनाडी ठाणे क्षेत्रात सायंकाळी 5 च्या सुमारास एका ऑटो रिक्षाला आग लागली होती. या अपघाताचे सीसीटीव्ही फुजेट उजेडात आले आहे. त्यात स्पष्टपणे एका बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतीजवळ एका ऑटो रिक्षात तीव्र स्फोट होताना दिसून येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एका प्रवाशाने रिक्षात बॅग ठेवली होती. या बॅगमध्ये स्फोटके असल्याचा दावा केला जात आहे. पोलिसांनी प्राथमिक निवेदनाद्वारे या घटनेचा तपास सुरू असल्याचे म्हटले होते. पण अद्याप त्यांनी या प्रकरणी ठोस माहिती दिली नाही.

कर्नाटक सरकारने या अतिरेकी हल्ल्याच्या चौकशीत केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेण्याचे सूतोवाच केले आहे.
कर्नाटक सरकारने या अतिरेकी हल्ल्याच्या चौकशीत केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेण्याचे सूतोवाच केले आहे.
बातम्या आणखी आहेत...