आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manhoman Sing Death Face News । Manhoman Sing। Former Prime Minister Manmohan Singh's Face Death News Viral On Social Media

फेक न्यूज एक्सपोज:सोशल मीडियावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनाची खोटी माहिती व्हायरल; अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर आज सकाळपासून एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. त्याची तुलना भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासोबत केली जात आहे. त्या फोटोत मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याचे म्हटले गेले आहे. इतकेच नव्हे तर अनेक युजर्सनी सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर करत लिहले आहे की, 'भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्माला शांती देवो' असे म्हणत अनेक जर श्रद्धांजली देखील अर्पण करत आहे.

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोशी मनमोहन सिंह यांच्याशी काहीही संबंध नाही. बुधवारी मनमोहन सिंह यांना ताप आल्यामुळे त्यांना दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिव्य मराठीने AIIMS च्या डॉक्टरांशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, सिंह यांची प्रकृती ठणठणीत असून, ते पुर्णपणे रिकव्हर झाले आहे.

मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी पुर्णपणे खोटी असून, बुधवारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मंडाविया यांनी मनमोहन सिंह यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. व त्यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली होती.

दरम्यान आज सकाळपासूनच सोशल मीडियावर मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी व्हायरल होत असून, ही बातमी पुर्णपणे खोटी आहे.

बातम्या आणखी आहेत...