आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकात लैंगिक छळ:आरोपी शिवमूर्तीच्या पुरुषत्वाची तपासणी, एनजीओ ‘ओडानाडी’ने केली सीबीआय चौकशीची मागणी

बंगळुरूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकात अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणातील मुरुगा मठाचे मुख्य पुजारी आणि लिंगायत संत शिवमूर्ती मुरुगा शरणारूची सीबीआय अथवा न्यायालयाच्या नियंत्रणात चौकशी करावी, अशी मागणी म्हैसुरूची एनजीओ ओडानाडीचे संचालक स्टॅनले के. वर्गीस यांनी केली आहे.

वर्गीस रविवारी म्हणाले की, ‘प्रशासनातील काही लोक शिवमूर्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवमूर्तीची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. कारण माध्यमांत आधी होस्टेलमधून अनेक मुली बेपत्ता असल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यात एका नेत्रहीन नातीचाही समावेश आहे. वर्गीस म्हणाले की, काही रहस्यमय मृत्यू झाले आहेत, काही मुली बेपत्ता झाल्या आहेत, तर काही मुलींनी अत्याचारानंतर लग्न केले आहे. शिवमूर्तीने काही पीडित महिलांना पैसे देऊन गप्प बसवले आहे.’ दरम्यान, पोलिसांनी शनिवारी शिवमूर्तीच्या पुरुषत्वाची तपासणी केली.

इयत्ता दहावीच्या दोन अल्पवयीन मुलांचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून शिवमूर्तीविरुद्ध पॉक्सो व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला गुरुवारी अटक करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...