आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारी नेतेपदी निवड:त्रिपुरात माणिक साहा पुन्हा मुख्यमंत्री, 8 राेजी शपथविधी

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणिक साहा पुन्हा एकदा त्रिपुराचे मुख्यमंत्री होतील. सोमवारी भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड झाली. शपथविधी ८ मार्च रोजी होईल. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणे अपेक्षित आहे. याआधी केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाईल, असा कयास लावला जात होता. साहा जनजाती समुदायासोबत सौहार्द संबंध निर्माण करण्यात ते महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, असे मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...