आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जयपूर:मनिपाल यूनिव्हर्सिटी जयपूरः शिक्षणासाठी उत्तम पर्याय

जयपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

चांगल्या शिक्षणाचा पायाच मुलांच्या भविष्याची दिशा ठरवत असतो. यामुळे प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याचे शिक्षण चांगल्या शाळेत किंवा यूनिव्हर्सिटीमधून व्हावे असे वाटते. त्यामुळे संस्था चांगली असेल, तर मुलांच्या शिक्षणाचा हेतू पुर्ण होतो. मुलांच्या भवितव्यासाठी त्यांच्या पालकांसह, अशी अनेक विद्यापीठे आहेत जी विविध अभ्यासक्रम आणि सुविधांद्वारे मुलांच्या करिअर सुकर बनवित आहेत.

अशाच उत्तम विद्यापीठांपैकी एक आहे, 2011 मध्ये स्थापन झालेले मनिपाल युनिव्हर्सिटी जयपूर. हे विद्यापीठ जयपूरच्या बाहेरील भागात 122 एकरांवर पसरलेले आहे.  

एक मल्टी-डिसिपलिनरी विद्यापीठ म्हणून MUJ इंजीनियरिंग, आर्किटेक्चर, फॅशन डिझाइन, इंटीरियर डिझाइन, फाइन आर्ट्स, हॉस्पिटॅलिटी, ह्यूमॅनिटीज, जर्नलिज्म आणि मास कम्युनिकेशन, बेसिक सायंसेज ,“लॉ, बिजनेस अँड कॉमर्स, मॅनेजमेंट, कंप्यूटर अॅप्लीकेशन, हॉटेल मॅनेजमेंट आणि सोशल सायंसेज विषयांमध्ये यूजी, पीजी आणि डॉक्टोरल स्तरावरील अभ्यासक्रम देतात.

जाणून घ्या की, मनिपाल यूनिव्हर्सिटी जयपूरमध्ये असे काय खास आहे, जे इतर विद्यापीठांपेक्षा MUJ ला चांगली बनवण्यात मदत करते.

शिक्षण देण्याची पद्धत वेगळी आहे

यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमाची रुपरेषा विद्यार्थी, पालक, शिक्षक व उद्योग आणि शैक्षणिक जानकारांकडून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारावरर विविध विषयांच्या बोर्ड ऑफ स्टडीजकडून अप्रूव्हल मिळाल्यानंतर तयार केली जाते. इसके साथ ही विभिन्न विषयों के पाठ्यक्रमांना वेळ आणि गरजेनुसार बदलण्यात येते. पाठ्यक्रमांना याप्रकारे तयार करण्यात आले आहे, ज्यातून वैचारिक व व्यव‌हारिक शिक्षणासोबत रोजगार केंद्रित अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

यूनिव्हर्सिटी Choice Based Credit System (CBCS) मधून अभ्यास देत आहेत आणि विद्यार्थ्यांना परदेशातील नावजलेल्या  यूनिव्हर्सिटमध्ये शिक्षण घेण्यासाठी क्रेडिट एक्सचेंज प्रोग्राम देण्यात येतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येतात आणि विविध स्ट्रीमसमधून विविध विषयांना निवडण्याचा पर्याय मिळतो. उद्योगातील तज्ञांना नियमितपणे विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी आणि अभ्यासक्रमात गंभीर औद्योगिक दृष्टीकोन देण्यासाठी त्यांना आमंत्रित केले जाते. इथले वातावरण प्रत्येक स्तरावरील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना तयार करते.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्य प्रशिक्षण

MUJ ने विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था आणि विविध कंपन्यांशी करार केले आहेत. विद्यापीठाने एक एंटरप्रिन्योर सेल स्थापन केला आहे आणि स्टार्ट अप्ससाठी समर्थन दिले जात आहे. विद्यापीठाने अटल इनक्युबेशन सेंटर स्थापन केले आहे, ज्यास  NITI AYOG कडून अर्थसहाय्य पुरवले जाते. राजस्थान सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने विद्यापीठास उत्कृष्टता केंद्र म्हणून मान्यता दिली आणि तांत्रिक व प्रशिक्षण केंद्र म्हणून नामित केले. विद्यापीठाने सुमारे 48 स्टार्ट अप्स सुरू केले आहेत, त्यापैकी बर्‍याच स्टार्ट अप्सना खासगी आणि सार्वजनिक निधीही मिळाला आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांना कौशल्य-आधारित प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या रोजगारामध्ये सुधारणा करण्यासाठी एमयूजेने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाशी (एनएसडीसी) करार केला आहे.

विद्यार्थी अनुकूल विद्यापीठ वातावरण

मनिपाल युनिव्हर्सिटी जयपूर येथे विद्यार्थ्यांना चांगल्या मूलभूत सुविधा पुरविल्या जातात. आयसीटी आणि वायफाय असलेले वर्ग, प्रयोगशाळेसाठी अत्याधुनिक उपकरणे, आर्किटेक्चर स्टुडिओ, फाइनआर्ट मीडिया लॅब, भाषा प्रयोगशाळेची उपलब्धता इत्यादी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांनुसार या सुविधा पुरविल्या जातात. विद्यार्थ्यांसाठी 7000 हून अधिक लॅपटॉप / संगणक उपलब्ध आहेत आणि  PARAM-SHAVAK सारख्या सुपरकंप्यूटर सुविधांचा देखील येथे समावेश आहे. येथील काही प्रयोगशाळांना C-DAC,बॉश, Siemens, Rexroth सारख्या कॉरपोरेट्सच्या मदतीने बनवले आहे. विद्यापीठ परिसर वातानुकूलित असून सौरऊर्जेपासून बनविलेली वीज मोठ्या प्रमाणात वापरली जाते. यासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता संपूर्ण कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या चांगल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी, अंतर्गत आणि मैदानी खेळाचे मैदान आहे. या व्यतिरिक्त दोन मल्टीमीडिया एसी सभागृह आणि एक अँफिथिएटर देखील बांधले गेले आहे.

उत्तम प्लेसमेंट आणि करिअर पर्याय

येथे प्लेसमेंट सेल देखील स्थापित करण्यात आला आहे जो विद्यार्थ्यांना वेळेवर प्लेसमेंट मिळविण्यात मदत करतो. इथले शिक्षण संपताच बर्‍याच विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळतात. तर 20 टक्के विद्यार्थी नोकरीऐवजी उच्च शिक्षण घेतात. दरवर्षी प्रमाणे, 2019-20 मध्ये इथल्या विद्यार्थ्यांना एक चांगले पॅकेज देण्यात आले असून त्या अंतर्गत सर्वाधिक आणि सरासरी पॅकेज 42 लाख रुपये आणि 6.02 लाख रुपये वार्षिक देण्यात आले.

फॉर्च्युन 500 कंपन्यांपैकी 27 कंपन्यांनी प्लेसमेंटसाठी कॅम्पसला भेट दिली. गेल्या काही वर्षांपासून पात्र उमेदवार उपलब्ध झाल्यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर कंपन्यांचा विश्वास वाढत आहे, यामुळे येथील विद्यार्थी माइक्रोसॉफ्ट, डेल, एक्सेंचर, कॅपजेमिनी, फिलिप्स, माइंडट्री, एचपीई, टीसीएस, इन्फोसिस, जेडएस एसोसिएट्स, सारखे प्रमुख रिक्रूटर्सकडून जॉब ऑफर मिळाले आहेत. SAP लैब्स, एरिक्सन, महिंद्रा एंड महिंद्रा,ब्रेसलकोन , टाटा पॉवर, केदेंस, सिनोप्सिस, यामाहा, ओएसिस इन्वेस्टमेंट(दुबई)  सारख्या  कंपन्यानी येथे विझीट केल्या आहेत. येथील विद्यार्थी जगातील अनेक कंपन्यात उच्च पदावर कार्यरत आहेत.
 
विद्यार्त्यांच्या उदयोन्मुख कौशल्यांना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत

गुणवंत विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि समर्पण वाढविण्यासाठी, मनिपाल विद्यापीठ दरवर्षी 3 कोटी रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती देते. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीला एक नवी आशा मिळते आणि जर तो विद्यार्थी गरीब असेल तर त्याचा अभ्यास आर्थिक कमतरतेमुळे कमी होणार नाही, याकडे लक्ष दिले जाते.
 

मंजूरी आणि मान्यता
विद्यापीठ UGC द्वारे मान्यता प्राप्त

NAAC कडून 3.28 स्कोरसोबत A+ Grade.

BTech प्रोग्राम्स AICTE द्वारे मान्यता प्राप्त.

BA-LLB (Hons) , BBA- LLB (Hons) आणि  LLB  प्रोग्राम्स Bar Council of India (BCI) द्वारे मान्यता प्राप्त.

BArch प्रोग्राम Council of Architecture (COA) द्वारे मान्यता प्राप्त.   आपणाससुद्धा आपले भविष्य यशाच्या उंचावर आणायचे असेल, तर अभ्यासासाठी शिक्षण संस्था निवडताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. जिथे उच्च शिक्षण प्रणाली मूलभूत ज्ञान, चांगले स्थान, अभ्यासासाठी योग्य वातावरण आहे. याबरोबरच संस्थेची ओळख मिळवणे देखील महत्त्वाचे आहे जेणेकरून आपण आपल्या भविष्यात परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे ठरविले तर ती संस्था आपल्याला पूर्णपणे पाठबळ देऊ शकेल.

Advertisement
0