आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manipur Violence During Protest Marches; Boxer Mary Kom Says My State Is Burning | Appeals PM Modi | Manipur

फ्लॅग मार्च:आदिवासींच्या मोर्चादरम्यान मणिपूरमध्ये हिंसाचार, 8 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी, बॉक्सर मेरी कोमने मोदींकडे मागितली मदत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मणिपूरमधील इंफाळ, चुराचंदपूर आणि कांगपोकपी येथे बुधवारी रात्री आदिवासींच्या मोर्चादरम्यान हिंसाचार झाला. त्यानंतर 8 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच 5 दिवस इंटरनेट बंद ठेवण्यात आले होते. अनुसूचित जमातीच्या दर्जाबाबत न्यायालयाच्या आदेशाविरोधात आदिवासी गट आंदोलन करत आहेत. हिंसाचारानंतर लष्कराला पाचारण करण्यात आले. गुरुवारी लष्कराने राज्यातील हिंसाचारग्रस्त भागात फ्लॅग मार्च काढला. दरम्यान भारतीय महिला बॉक्सर मेरी कोमने ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.

मेरी कोमने रात्री 2.45 वाजेच्या सुमारास ट्विट केले की, "माझे राज्य मणिपूर जळत आहे. कृपया मदत करा." या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग करत मणिपूरमध्ये जाळपोळ झाल्याचे फोटो शेअर केले आहे.