आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manipur Violence Most Of The Houses Were Burnt Assam Livelihood Of Naga Kuki Community 

मणिपूर हिंसाचार:जीव वाचवण्यासाठी पळताहेत लोक, बहुतांश घरे जाळली गेली; आसाम : नागा-कुकी समुदायाची आपबीती

सत्यनारायण मिश्रा | इंफाळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मणिपूरमधून इतर राज्यातील लोक आणले जात आहेत. तेथून नागा-कुकी आणि मिझो समुदायाचे लोक परतले आणि मंगळवारी आसाममध्ये पोहोचले. यामध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. मणिपूरचा सर्वाधिक हिंसाचारग्रस्त भाग चुराचंदपूर येथील दोरबुंग येथून आलेल्या कुकी समुदायाच्या कोमिंथे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी अचानक घरातून पळावे लागले. सुरक्षा दलाच्या पाठीमागे मेईतेई समुदायाचे लोक होते, जे हल्ला करण्यासाठी धावत होते. त्यांच्याकडे शस्त्रे होती. आम्ही निशस्त्र होतो. आता एक-दोनच घरे जळण्यापासून वाचली आहेत.

तीन हजार लोकांना मणिपूरमधून बाहेर काढले
मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांमध्ये घरे रिकामी ,पडझड झाली आहेत. या घरांमधून मालमत्ता लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्या थांबवण्यासाठी अशा भागांची ओळख पटवून रात्रंदिवस सुरक्षा सतर्कता वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. उत्तराखंड, यूपी, एमपीसह १२ राज्यांनी ३ हजारांवर विद्यार्थ्यांना मणिपूरमधून बाहेर काढले आहे.