आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​सिसोदिया 17 मार्चपर्यंत ED च्या ताब्यात:7 आरोपींची चौकशी करणार तपास यंत्रणा; CBI च्या जामीन अर्जावर 21 मार्चला सुनावणी

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली दारु घोटाळ्याप्रकरणी अटकेत असेलेल मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर 21 मार्चला सुनावणी होणार आहे. तर ईडीला सिसोदिया यांची 7 दिवसांची (17 मार्च) कोठडी ​​​​​​ दिली आहे. ईडीने सिसोदिया यांची 10 दिवसांची कोठडी मागितली होती.

ED दुपारी 2 वाजता दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात पोहचली होती. आतापर्यंत दिल्ली दारु घोटाळ्याप्रकरणात आणखी 7 जणांना नोटीस पाठवले आहे. सिसोदिया यांच्या समोरा-समोर बसून त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी सिसोदिया यांची 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केल्याचे ईडीने म्हटले होते.

हा फोटो 6 मार्चचा जेव्हा सिसोदिया यांना तिहार तुरुंगात नेण्यात येत होते.
हा फोटो 6 मार्चचा जेव्हा सिसोदिया यांना तिहार तुरुंगात नेण्यात येत होते.

कोर्टात कस्टडीसाठी ED चे 4 युक्तिवाद

1.सिसोदिया यांच्या प्रतिनिधीने कविता यांची भेट घेतली

सिसोदिया यांचा सहकारी विजय नायर संपुर्ण काम पाहत होता. या घोटाळ्यात सरकारी व्यवस्था, मध्यस्थ आणि इतर काही लोकांचा सहभाग होता. हा संपुर्ण कट नायर, सिसोदिया, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता आणि इतर लोकांनी मिळून रचला होता.

2.AAP नेत्यांना 100 कोटींची लाच

दक्षिणेतील एका गटाने AAP नेत्यांना 100 कोटींची लाच दिली. दिल्लीत 30% दारू व्यवसाय चालवण्यासाठी एक गट बनवण्यात आला. सिसोदिया यांचा प्रतिनिधी म्हणून नायरने कविता यांची भेट घेतली होती, हे कागदपत्रातून स्पष्ट होते. सिसोदिया कशाप्रकारे लिकर पॉलिसाला प्रभावित करु शकतात हे नायर कविता यांना सांगण्याचा प्रयत्न करत होता.

3. एका वर्षात 14 फोन तोडले. सिसोदियाच्या नावावर हे फोन नव्हते
रोहैब म्हणाला की, एका वर्षात 14 फोन वापरण्यात आले आणि वापर झाल्यानंतर फोडण्यात आले. दुसऱ्यांनी खरेदी केलेले फोन सिसोदिया यांनी खरेदी केले. सिम कार्डही सिसोदिया यांच्या नावावर नव्हते.

4. सिसोदिया यांची सुरवातीपासूनच टाळाटाळ
एकही फोन सिसोदिया यांच्या नावावर नाही. एक सिम कार्ड देवेंद्र शर्मा यांच्या नावावर होते. या प्रकरणात सर्व पुरावे नष्ट केल्याचे दिसून येत आहे. सिसोदिया सुरवातीपासूनच टाळाटाळ करत आहेत, असे ईडीने म्हटले.

सिसोदिया यांच्या वकिलाचे 3 युक्तिवाद

1. दारू योजना ही निवडलेल्या सरकारने बनवली
मनीष सिसोदिया यांचे वकिल दयान कृष्णन म्हणाले की, मद्य धोरण चुकीचे आहे असे ED म्हणत आहे. ही धोरण एका निवडणून आलेल्या सरकारने बनवले आहे. या धोरणाने अनेक टप्पे पार केले आहेत. धोरण हे सरकार, ऑफिसर, फायनान्स आणि लॉसेक्रेटरीकडे जाते. तसेच हे धोरण नायब राज्यपाल यांच्याकडेही जाते.

2.घाईची अनेक उदाहरणे
त्यांनी म्हटले की, ही दारू धोरण नायब राज्यपाल यांच्याकडेही गेले होती. LG म्हणजेच केंद्र सरकार. त्यांनी बाबींची विचारणा केली. पण, यात एकही प्रॉफिट मार्जिन किंवा पात्रतेशी जुडलेले नव्हते. तसेच ईडी धोरण लागू करण्याच्या घाईबद्दल बोलत आहे. अशी घाईची अनेक उदाहरणे मी देऊ शकतो. नोटाबंदी घाईतच झाली आणि सर्वोच्च न्यायालयानेही ती घटनात्मक घोषित केली.

3. ईडी एका रुपयाचीही चौकशी करू शकले नाही
कृष्णन म्हणाले, 'ईडी म्हणत आहे की विजय नायर हे सिसोदिया यांच्या वतीने काम करत होते. ईडीला आतापर्यंत असे काहीही सापडलेले नाही. ज्यामध्ये सिसोदिया यांना एक रुपयाही पाठवला गेला आहे. त्याने अद्याप असे का केले नाही? दस्तऐवज पहावेत. आम्ही ऐकले, असेच ईडी म्हणत आहे.

हा फोटो सिसोदिया यांच्या अटकेच्या दिवसाचा आहे, जेव्हा सीबीआय त्यांना चौकशीनंतर घेऊन गेली होती.
हा फोटो सिसोदिया यांच्या अटकेच्या दिवसाचा आहे, जेव्हा सीबीआय त्यांना चौकशीनंतर घेऊन गेली होती.

सिसोदिया यांनी तुरुंगातून लिहली चिठ्ठी
मनीष सिसोदिया यांनी तुरुंगातून देशाच्या नावाने पत्र लिहले होते. त्यात‘ शिक्षा पॉलिटिक्स’ विरुद्ध ‘जेल पॉलिटिक्स’ असे म्हटले होते. तिन पानांचे हे पत्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर शेअर केले होते. मनीष सिसोदियाने पत्रात म्हटले होते की, मोठ्या जागांवर असलेल्या नेत्यांनी स्कूल-कॉलेज का नाही बनवले. त्यांनी शिक्षाबाजूला का सारली. जर राज्यकर्त्यांनी संपुर्ण शक्ती पणाला लावली असती. तर आज विकसित देशाप्रमाणे भारतातील मुलेही चांगल्या शाळेत शिक्षण घेत असते.

त्यांनी म्हटले की, शिक्षाचे राजकारण हे कठीण काम आहे. शिक्षक आणि पालकांना प्रेरित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तर जेल पॉलिटिक्समध्ये कुणाला तुरुंगात पाठवण्यासाठी तपास यंत्रणांवर दबाव टाकणे खूप सोपे असते. टीकाकारांना गप्प करण्यासाठी त्यांना तुरुंगात पाठवले जाते. जेव्हा उत्तर प्रदेशात एका गायिकाने आवाज उठवला तर त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली.

आरोपींची समोर-समोर बसवसून चौकशी
ईडीने म्हटले की, मद्य धोरण बनवण्यासाठी दक्षिण दिल्लीतील व्यापाऱ्यांकडून 100 कोटींची लाच घेतली होती. यात ED 6 मार्चला हैदराबादमधून अरुण रामचंद्र पिल्लई आणि अमनदीप ढल यांना अटक केली. चौकशीत यांनी सिसोदिया यांचे नाव घेतले होते. ED ची टीम या दोन आरोपींसह तिहार तरुंगात पोहचली होती.

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीला ईडीचे समन्स

ED ने तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी कविता हिला 11 मार्च रोजी दिल्ली दारू धोरण प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने यापूर्वी कविताला 9 मार्चला समन्स बजावले होते. यावर कविता यांनी एजन्सीकडे आठवड्याची मुदत मागितली होती.

चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही कविता यांनी म्हटले होते. भारत राष्ट्र समिती (BRS) नेत्या कविता यांची विनंती स्वीकारून ईडीने त्यांना नव्याने समन्स बजावले आहे. यापूर्वी 12 डिसेंबर रोजी सीबीआयने कविताची हैदराबादमध्ये सुमारे 7 तास चौकशी केली होती.

महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यासाठी बीआरएस नेत्या कविता बुधवारी दिल्लीत पोहोचल्या होत्या.
महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यासाठी बीआरएस नेत्या कविता बुधवारी दिल्लीत पोहोचल्या होत्या.

सिसोदिया यांचे शेजारी दहशतवादी गुन्हेगार

मनीष सिसोदिया यांना तिहारच्या तुरुंग क्रमांक 1 मधील वॉर्ड क्रमांक 9 मध्ये ठेवण्यात आले आहे. हा ज्येष्ठ नागरिक वॉर्ड आहे, जेथे त्यांच्यावर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जाईल. काही दहशतवादी गुन्हेगारही या प्रभागात सिसोदिया यांचे शेजारी आहेत. केजरीवाल सरकारमध्ये मंत्री राहिलेले सत्येंद्र जैन हेही या प्रभागात 7 व्या क्रमांकावर आहेत. सिसोदिया आणि जैन यांच्या सेलमधील अंतर 500 मीटर आहे.

तुरुंग अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, सिसोदिया यांना येत्या काही दिवसांत त्यांचा सेल अन्य आरोपींसोबत शेअर करावा लागू शकतो. सिसोदिया हे अंडर ट्रायल आरोपी आहेत, त्यामुळे ते जेलमध्ये त्यांच्या सोयीनुसार कपडे घालू शकतात. त्यांना तुरुंगातून काही कपडेही देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...