आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली मद्य धोरण प्रकरणी अटक करण्यात आलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना शनिवारी राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. यादरम्यान सीबीआयने त्यांना आणखी तीन दिवसांची कोठडी मागितली. दरम्यान, न्यायालयाने दोन दिवसांच्या कोठडीत वाढ केली आहे. त्याचबरोबर सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर 10 मार्च रोजी निर्णय येणार आहे.
26 फेब्रुवारी रोजी अटक केल्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने सिसोदिया यांना 5 दिवसांची कोठडी सुनावली होती, जी आज (4 मार्च) पूर्ण झाली आहे. न्यायालयात हजर होण्यापूर्वी सीबीआय मुख्यालयाबाहेर पोलीस, जलद कृती दल आणि सीआरपीएफचे जवान तैन्यात करण्यात आले होते.
शुक्रवारी जामीनासाठी अर्ज केला होता
शुक्रवारी सिसोदिया यांनी कनिष्ठ न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या याचिकेत त्यांनी सीबीआय चौकशीत सहकार्य केल्याचे लिहिले आहे. जेव्हा जेव्हा त्यांना बोलावले जाते तेव्हा ते आले होते. सर्व वसुली सीबीआयने केली असल्याने त्याला आता कोठडीत ठेवण्याचे कोणतेही वैध कारण नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.
8 तासांच्या चौकशीनंतर 26 फेब्रुवारीला झाली होती अटक
सीबीआयने 8 तासांच्या चौकशीनंतर 26 फेब्रुवारीला सिसोदिया यांना अटक केली होती. त्यांना 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सिसोदिया यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी दिली होती. 28 फेब्रुवारीला सकाळी काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सिसोदिया यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली, त्याला मान्यता देण्यात आली.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता या प्रकरणाची सुनावणी झाली. ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आणि तुम्ही उच्च न्यायालयात जा, थेट आमच्याकडे येण्यात काय अर्थ आहे. आपण चुकीच्या परंपरेला चालना देऊ शकत नाही. दुसरीकडे, सिसोदिया यांच्या अटकेपूर्वी केजरीवाल सरकारमधील दुसरे मंत्री सत्येंद्र जैन हे तिहार जेलमध्ये आहेत. जैन व सिसोदिया यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
आतिशी आणि सौरभ हे दिल्ली सरकारचे नवे मंत्री
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज यांची नावे एलजीकडे मंजुरीसाठी पाठवली आहेत. आता सिसोदिया आणि जैन यांच्या खात्याची जबाबदारी कैलाश गेहलोत आणि राजकुमार आनंद यांच्याकडे असेल. यासंदर्भात राजपत्रात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. सौरभ भारद्वाज हे केजरीवाल यांच्या 49 दिवसांच्या पहिल्या सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. आतिशी मार्लेना या शिक्षण क्षेत्रातील सिसोदिया यांच्या सल्लागार होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.