आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manish Sisodia Tihar Jail; Delhi Liquor Policy Scam | ED Investigation | AAP Party | Arvind Kejriwal

मनीष सिसोदियांची तिहारमध्ये EDकडून चौकशी:केजरीवाल म्हणाले- देशभक्तावर खोटी केस, कोठडीमुळे सिसोदियांचे धैर्य कमी होणार नाही

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर न्यायालय 10 मार्च रोजी दुपारी 2 वाजता निकाल देणार आहे.

दिल्ली मद्य घोटाळ्यात सीबीआयनंतर आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ही मनीष सिसोदिया यांची चौकशी करणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सिसोदिया यांची चौकशी करण्यासाठी ईडी तिहार तुरुंगात पोहोचली आहे. यापूर्वी, ईडीने सिसोदिया यांचा जबाब नोंदवण्यासाठी राऊज अव्हेन्यू कोर्टाकडे परवानगी मागितली होती.

रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या हवाल्याने ईडीच्या प्रश्नांची यादीही देण्यात आली आहे. पहिली- 100 कोटींच्या लाचेबद्दल काय माहिती आहे? मद्याचे धोरण का बदलले?

सिसोदिया प्रकरणाशी संबंधित अपडेट्स...

ईडीला कोर्टाकडून सिसोदिया यांची तीन दिवस चौकशी करण्याची परवानगी मिळाली आहे. सिसोदिया यांच्या समर्थनार्थ केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे.

केजरीवाल म्हणाले- तुरुंगाच्या कोठडीमुळे त्यांचे धैर्य कमी होणार नाही

दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल सिसोदियांबद्दल म्हणाले- "आज मला देशाची चिंता आहे, सिसोदिया किंवा सत्येंद्र जैन यांची नाही. हे दोघेही खूप शूर आहेत, देशासाठी प्राणही देऊ शकतात. तुरुंगात सिसोदिया यांचे धैर्य ती कोठडी कमी करू शकत नाही."

केजरीवाल म्हणाले- "मी होळीच्या दिवशी संपूर्ण दिवस देशासाठी ध्यान करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की पंतप्रधान चांगले काम करत नाहीत, तर मी तुम्हाला विनंती करतो की, होळी साजरी केल्यानंतर थोडा वेळ देशासाठी पूजा करा."

दिल्ली मद्य घोटाळ्यात 11वी अटक

याप्रकरणी ईडीने हैदराबादच्या मद्यविक्रेत्या अरुण रामचंद्र पिल्लईला अटक केली आहे. या प्रकरणातील ही 11वी अटक आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर सोमवारी संध्याकाळी पिल्लईला पीएमएलए अंतर्गत अटक करण्यात आली. अरुण हा मद्य व्यावसायिकांच्या 'साऊथ ग्रुप'चा प्रमुख आहे. त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले जाईल, जेथे ईडी चौकशीसाठी त्याच्या कोठडीची मागणी करेल.

तुरुंंगात सिसोदिया यांच्या शेजारी क्रूरकर्मा गुन्हेगार

हा फोटो सिसोदिया यांच्या अटकेच्या दिवसाचा आहे, जेव्हा सीबीआय त्यांना चौकशीनंतर घेऊन गेली होती.
हा फोटो सिसोदिया यांच्या अटकेच्या दिवसाचा आहे, जेव्हा सीबीआय त्यांना चौकशीनंतर घेऊन गेली होती.

मनीष सिसोदिया (51) यांना तिहारच्या तुरुंग क्रमांक 1च्या वॉर्ड क्रमांक 9 मध्ये ठेवण्यात आले आहे. हा ज्येष्ठ नागरिक वॉर्ड आहे, जेथे त्यांच्यावर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जाईल. काही क्रूरकर्मा गुन्हेगारही या भागात सिसोदिया यांचे शेजारी आहेत. तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सिसोदिया यांना येत्या काही दिवसांत त्यांचा सेल इतर आरोपींसोबत शेअर करावा लागू शकतो. पहिल्या दिवशी सिसोदिया यांना तुरुंगात एक स्पर्श किट देण्यात आली आहे, ज्यामध्ये टूथपेस्ट, साबण, टूथब्रश आणि दैनंदिन वापरातील इतर वस्तूंचा समावेश आहे.

सिसोदिया हे अंडर ट्रायल आरोपी आहेत, त्यामुळे ते जेलमध्ये त्यांच्या सोयीनुसार कपडे घालू शकतात. त्यांना सोमवारी रात्री कारागृहातूनच काही कपडे देण्यात आले. मात्र, मंगळवारी त्यांचे कुटुंबीय कपडे आणि वैयक्तिक वस्तू घेऊन त्यांना भेटायला येऊ शकतात.

मद्य धोरणप्रकरणी 20 मार्चपर्यंत तुरुंगात राहणार सिसोदिया

सिसोदिया यांना सोमवारीच दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. सिसोदिया यांना गेल्या महिन्यात २६ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीत विशेष CBI न्यायाधीश एमके नागपाल यांनी सिसोदिया यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

CBIच्या वकिलांनी सांगितले होते की, सिसोदिया यांच्या पुढील कोठडीची मागणी केली जात नाही, परंतु पुढील 15 दिवसांत गरज भासल्यास पुन्हा कोठडीची मागणी केली जाऊ शकते.

सिसोदिया यांना तुरुंगात मिळणार या सुविधा

  • आरोपीला मेडिटेशन सेलमध्ये ठेवण्याच्यावर अपिलावर तुरुंग अधीक्षकांनी लक्ष द्यावे.
  • सिसोदिया यांना तुरुंगात डायरी, पेन, भगवत गीता आणि चष्मा ठेवण्याची परवानगी द्यावी.
  • माजी उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या एमएलसीमध्ये लिहून दिलेली औषधे घेण्याची परवानगी आहे.
  • मनीष सिसोदिया यांना आता 20 मार्च रोजी दुपारी 2 वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मद्य धोरण खटल्यात CBI ने नाही मागितली कोठडी

दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मनीष सिसोदियांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सिसोदिया यांना तिहारमध्ये ठेवण्यात येणार आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश एमके नागपाल यांनी सिसोदिया यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. येथे वाचा सविस्तर वृत्त

बातम्या आणखी आहेत...