आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manish Tewari Book| Manish Tewari On Manmohan Singh Government And UPA Weakness On Mumbai Attacks In New Book

आणखी एक पुस्तक बॉम्ब:26/11 च्या हल्ल्यानंतर पाकविरुद्ध कारवाई न करणे यूपीए सरकारचा कमकुंवतपणा होता; काँग्रेस नेते मनीष तिवारींनी पुस्तकात उपस्थित केले प्रश्न

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकाचा वाद सुरू असताना आणखी एका काँग्रेस नेत्याने आपल्या पुस्तकातून खळबळ माजली आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी आपल्या नवीन पुस्तकात 2008 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना तत्कालीन यूपीए सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर पाकिस्तानने हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई न करणे हा तत्कालीन केंद्र सरकारचा कमकुंवतपणा होता असे तिवारींनी लिहिले आहे.

26/11 हल्ल्यात अजमल कसाब या एकमेव दहशतवादी जिवंत पकडला गेला होता.
26/11 हल्ल्यात अजमल कसाब या एकमेव दहशतवादी जिवंत पकडला गेला होता.

मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावले उचलायला हवे होते. ती प्रत्यक्ष कारवाई करण्याची वेळ होती. पाकिस्तानसारखा एक देश निर्दोष लोकांचा नरसंहार करतो आणि त्याला पश्चाताप सुद्धा होत नाही. यानंतरही आपण संयम बाळगत असाल तर हे कमकुंवतपणेचे लक्षण आहे. मनीष तिवारींनी आपल्या पुस्तकात 26/11 च्या हल्ल्याची तुलना अमेरिकेत 11 सप्टेंबर 2001 ला झालेल्या हल्ल्यासोबत केली.

हल्ल्यानंतर सीएसटी स्टेशनवरील चित्र
हल्ल्यानंतर सीएसटी स्टेशनवरील चित्र

160 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू, शेकडो जखमी
मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात 160 पेक्षा अधिक लोकांच्या मृत्यूची नोंद आहे. तसेच 300 पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले होते. 26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री 8 वाजून 20 मिनिटाला अजमल कसाब आणि इतर 9 दहशतवाद्यांनी मुंबईत पाऊल ठेवले होते. यानंतर त्यांनी सलग 60 तास विविध ठिकाणी जाऊन बेछूट गोळीबार करत अख्ख्या मुंबईला वेठीस धरले होते. त्यांच्याकडे 10 एके-47, 10 पिस्तुल, 80 ग्रेनेड, 2 हजार काडतूसा, 24 मॅगेझीन, 10 मोबाइल फोन, स्फोटके आणि टायमर्स इत्यादी साहित्य होते.

बातम्या आणखी आहेत...