आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manish Tewari Ghulam Nabi Azad | Punjab Anandpur Sahib MP On Congress Party Situation

आझादानंतर मनीष तिवारी बंडखोरीच्या तयारीत:मी भाडेकरू नाही तर काँग्रेसचा भागीदार आहे, बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर पाहून घेऊ

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर आता पंजाबमधील आनंदपूर साहिबमधील काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनींही बंडाची तलवार उपसली आहे. 'आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. मी या पक्षाला 42 वर्षे दिली आहेत. माझ्यापेक्षा ज्यांनी पत्रे लिहिली त्यांनी पक्षाला जास्त वेळ दिला आहे. आम्ही भाडेकरू नाही, आम्ही या संस्थेचे भागीदार आहोत. जर तुम्ही आम्हाला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे परिणाम दिसतील, असे ते म्हणाले. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी आपले मत मांडले.

मनीष तिवारी म्हणाले की, मला गुलाम नबी आझाद यांच्यावर भाष्य करायचे नाही. त्याच्या पत्रातील गुण-दोषांमध्ये जायचे नाही. पक्षाबद्दलचे ‘ज्ञान’ हास्यास्पद आहे. आमच्यापैकी 23 जणांनी 2 वर्षांपूर्वी सोनिया गांधींना पत्र लिहिले होते की, पक्षाची स्थिती चिंताजनक आहे आणि ती गांभीर्याने घेतली पाहिजे. त्या पत्रानंतर सर्व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेस आणि भारत हे एकसारखाच विचार करत असे आपण मानले. तर आता दोघांपैकी कोणीही एक जण वेगळा विचार करू लागला आहे. मला वाटते 20 डिसेंबर 2020 रोजी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकमत झाले असते तर आज पक्षाचे वरिष्ठ नेते बाहेर पडले नसते.

दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष बनवण्याचा प्रयत्न करू, असे म्हटले आहे. आम्ही त्यांना विनंती करु आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असा विश्वास देऊ.

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्याबद्दल कोण काय म्हणाले?

आनंद शर्मा: आझाद यांचे दीर्घकाळचे सहकारी आणि G-23 गटाचे सदस्य आनंद शर्मा म्हणाले की, आझाद यांच्या निर्णयाने मला आश्चर्य वाटले. दुसरीकडे, G-23 गटाचे आणखी एक सदस्य संदीप दीक्षित यांनी आझाद यांना पत्र लिहून हे प्रकरण पक्षातील बदलाचे होते. तुम्ही बंडखोरी केली, असे म्हटले आहे.

मल्लिकार्जुन खरगे : काँग्रेस आज अडचणीत आहे, सर्वांना भाजप आणि आरएसएसविरुद्ध लढावे लागेल. लढाईच्या वेळी लढाईपासून पळ काढणे हा पक्षाचा विश्वासघात आहे. काँग्रेसने त्यांना सर्व काही दिले आहे. अशा वेळी ते ऋण फेडणे तुमचे कर्तव्य आहे.

सलमान खुर्शीद: जर आपण त्याच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर लक्षात येईल की, प्रत्येक वेळी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांना काहीतरी मिळत असे. पण, आता मिळाले नाही. त्याचा त्यांना राग आला. मला काहीही मिळाले नाही तर पक्षाचे नुकसान व्हावे, असे मला वाटत नाही.

सुनील जाखड : गुलाम नबी यांचा राजीनामा ही काँग्रेसच्या अंताची सुरुवात आहे. हे चक्र असेच चालू राहील. आता काँग्रेसने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.

भूपेश बघेल : आझाद यांनी काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत होते. काँग्रेस पक्षाने त्यांना सर्व जबाबदाऱ्या दिल्या. पण तरीही ते दोष शोधत राहिले. त्यांच्या जाण्याने पक्षाचे काहीही नुकसान होणार नाही.

नवा पक्ष काढण्याची आझादांची घोषणा
राजीनाम्यानंतर आझाद यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, माझे गांधी परिवाराशी चांगले संबंध आहेत. मी जे काही पत्रात लिहिले आहे, ते काँग्रेससाठी लिहिले आहे. इकडे आझाद यांच्या राजीनाम्यानंतर जम्मू-काश्मीरमधील 5 माजी आमदारांनीही राजीनामे दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...