आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mankhurd Station RPF Jawan Saves Child's Life VIDEO Updates, Child Got Out Of Mothers Hand, While Boarding Train In Crowd

जवानाने वाचवले बालकाचे प्राण VIDEO:गर्दीत रेल्वेत चढताना महिलेच्या हातातून सुटले मूल, RPF जवान बनला देवदूत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वर मंगळवारी दुपारी एक महिला आपल्या मुलासह आली होती. प्रचंड गर्दीत महिला रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात होती. रेल्वे सुरू होताच महिलेच्या हातातून मूल निसटले. ही बाब तेथे तैनात RPF जवान अक्षय सोये यांच्या लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता उडी मारून त्या मुलाला चालत्या ट्रेनखाली जाण्यापासून वाचवले.

अक्षय सोयेचे साहस पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकी दाखवत त्यांनी बालकाचा जीव वाचवण्यासाठी त्याने स्वत:च्या प्राणांची बाजी लावली. थोडीशीही चूक झाली असती तर त्यांचा स्वत:चा जीव धोक्यात आला असता. दुसरीकडे, ते नसते तर मूल रेल्वेखाली येऊन अनर्थही घडू शकला असता. ही संपूर्ण घटना स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर सर्वजण आरपीएफ जवानाचे कौतुक करत आहेत. एका सेकंदात त्यांनी ठरवले की मुलाला वाचवायचे आहे आणि त्यांनी त्याचे प्राण वाचवले. त्यांना थोडाही उशीर झाला असता तर मुलाचे प्राण वाचवणे कठीण झाले असते.

बातम्या आणखी आहेत...