आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mann Ki Baat 87th Edition: PM Narendra Modi Addresses Mann Ki Baat Programme Today

'मन की बात' कार्यक्रमाचा 87 वा भाग:मोदींकडून 'लोकल टू ग्लोबल' मोहिमेचा पुनरुच्चार, म्हणाले - भारताने 400 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे गाठले लक्ष्य

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाच्या 87 व्या भागाला संबोधित केले. यावेळी मोदींनी निर्यात या विषयापासून सुरवात केली. गेल्या आठवड्यात भारताने मोठी कामगिरी पार पाडली आहे. या कामगिरीने आम्हा सर्वांचा ऊर अभिमानाने भरून आल्याचे ते म्हणाले. भारताने गेल्या आठवड्यात 400 अब्ज डॉलर म्हणजेच 30 लाख कोटी रुपयांचे निर्यातीचे लक्ष्य गाठल्याचे मोदींनी सांगितले. प्रथमच असे दिसते की ही बाब अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. परंतु अर्थव्यवस्थेपेक्षा ती भारताच्या क्षमतेशी संबंधित असल्याचे त्यांनी म्हटलं.

भारतात बनवलेल्या वस्तूंना जगभरात मागणी -
जगभरात मेड इन इंडियाची मागणी वाढत असून भारताची पुरवठा साखळीदेखील दिवसेंदिवस मजबूत होत आहे. एकेकाळी भारतातून होणाऱ्या निर्यातीचा आकडा 100 अब्ज, कधी 1.5-शंभर अब्ज, कधी 20000 अब्ज होता, आज भारत 400 अब्ज डॉलरवर पोहोचला असल्याचे मोदींनी सांगितले.

संकल्प मोठा असावा -
स्वप्नांपेक्षा संकल्प मोठे असल्यावर देश मोठी पावले उचलतो. संकल्पांसाठी रात्रंदिवस प्रामाणिक प्रयत्न केले जातात, तेव्हा ते संकल्प सिद्धही होतात. तसेच माणसाच्या आयुष्यातही घडते. जेव्हा एखाद्याचे संकल्प, त्याचे प्रयत्न त्याच्या स्वप्नांपेक्षा मोठे होतात. तेव्हा यश त्याच्या हाती लागते, असे मोदी म्हणाले.

लडाखचे जगप्रसिद्ध जर्दाळू दुबईतही मिळतील -
देशाच्या कानाकोपऱ्यातून नवीन उत्पादने आता परदेशात जात आहेत. आसाममधील हैलाकांडीतील चामड्याची उत्पादने असो किंवा उस्मानाबादमधील हातमागाची उत्पादने असो, विजापूरची फळे आणि भाज्या असोत किंवा चंदौलीतील काळा तांदूळ असो, प्रत्येकाची निर्यात वाढत आहे. आता लडाखची जगप्रसिद्ध जर्दाळू दुबईतही मिळेल. एवढेच नाही, तर सौदी अरेबियात तामिळनाडूतून केळी पाठवली जातात, असे मोदी म्हणाले. ही यादी खूप मोठी आहे. यादी जितकी मोठी असेल तितकी मेक इन इंडियाची ताकद जास्त असेल आणि भारताची ताकद जास्त असेल. शेतकरी, कारागीर, विणकर, अभियंते, लघुउद्योजक, एमएसएमई क्षेत्र, बरेच वेगवेगळे व्यवसाय, ही सर्व देशाची खरी ताकद आहेत. आता तुम्ही इतर देशांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे भारतात बनवलेली उत्पादने पूर्वीपेक्षा जास्त दिसतील, असे मोदी म्हणाले.

लोकलला ग्लोबल बनवायचे आहे -
प्रत्येक भारतीय लोकल ग्लोबल बनवण्यासाठी काम करेल. तेव्हा जागतिक पातळीवर पोहचण्यासाठी वेळ लागत नाही. लोकल ते ग्लोबल होऊया आणि आपल्या उत्पादनांची प्रतिष्ठा वाढवूया, असे आवाहन मोदींनी देशवासियांना केले.

देश बदलत आहे, जुन्या व्यवस्थाही बदलताय -
आज आपले छोटे उद्योजक गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस म्हणजेच GeM द्वारे सरकारी खरेदीमध्ये मोठी भूमिका बजावत आहेत. गेल्या एका वर्षात GeM पोर्टलच्या माध्यमातून सरकारने एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू खरेदी केल्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 1.25 लाख छोटे उद्योजक, छोटे दुकानदार यांनी आपला माल थेट सरकारला विकला आहे. एक काळ असा होता, की फक्त मोठ्या कंपन्याच सरकारला वस्तू विकू शकत होत्या. पण आता देश बदलत आहे. त्यासोबतच जुन्या व्यवस्थाही बदलत आहेत. आता एक छोटा दुकानदारही GeM पोर्टलवर आपला माल ,सरकारला विकू शकत असल्याचे मोदींनी सांगितले.

नवा भारत स्वप्न पाहतो आणि ध्येय गाठतो -
नवा भारत केवळ मोठी स्वप्ने पाहत नाही, तर ज्या ध्येयापर्यंत कोणीही पोहोचले नाही. तेथे पोहोचण्याचे धाडसही दाखवतो. या साहसाच्या बळावर आपण सर्व भारतीय मिळून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न नक्कीच पूर्ण करू, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

बाबा शिवानंद यांचे जीवन प्रेरणादायी -
बाबा शिवानंद यांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, की नुकत्याच झालेल्या पद्म पुरस्कार सोहळ्यात तुम्ही बाबा शिवानंद यांना पाहिले असेल. 126 वर्षांच्या वृद्धाची तडफड पाहून माझ्यासारख्या सर्वांनाच आश्चर्य वाटले. वयाच्या 126 वर्षे आणि बाबा शिवानंद यांचा फिटनेस या दोन्ही गोष्टी आज देशात चर्चेचा विषय आहेत. त्यांचे जीवन आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहे, असे मोदी म्हणाले.

आयुष उद्योगाची बाजारपेठही सातत्याने वाढत आहे. स्टार्टअप जगतातही आयुष आकर्षणाचा विषय बनत आहे. हे भारतातील तरुण उद्योजकांचे आणि भारतात निर्माण होत असलेल्या नवीन शक्यतांचे प्रतीक आहे. यासोबतच आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि विशेषत: आयुष स्टार्टअप्सला आग्रह आहे की, त्यांनी आपली ऑनलाइन पोर्टल ही युनायटेडने मान्यता दिलेल्या सर्व भाषांमध्ये बनवण्याचा प्रयत्न करावा.

जलसंधारणाला अभियानाची गरज -
जलसंधारण अभियान मोठ्या प्रमाणात राबवावे लागेल. नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्ये पार पाडतो. स्वच्छता, पोषण, लसीकरण, या गोष्टींची काळजी घ्यावी. हे सर्व प्रयत्न निरोगी राहण्यास मदत करतात. भारताची संस्कृती, आपल्या भाषा, आपल्या बोली, आपली जीवनपद्धती, खाद्यपदार्थांची रुंदी, ही सर्व विविधता आपली मोठी ताकद आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे, ही विविधता भारताला एकत्र ठेवते. एक भारत- श्रेष्ठ भारत बनवते. यातही आपली ऐतिहासिक स्थळे आणि पौराणिक कथा या दोन्हींचा मोठा वाटा असल्याचे मोदींनी अधोरेखित केले.

सर्व सण मिळून साजरे करूया -
पंतप्रधानांनी लोकांना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना भेट देण्याचे आवाहन मोदींनी देशवासिायांना केले. यातून खूप काही शिकायला मिळेल, असे ते म्हणाले. महात्मा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी आहे आणि बाबासाहेबांची जयंती आपण 14 एप्रिलला साजरा करणार आहोत. या दोन्ही महापुरूषांनी भेदभाव, असमानता यांच्या विरोधात खूप मोठा लढा दिला, असल्याचे मोदी म्हणाले. तसेच येणारे सण सर्वांनी एकत्र घेऊन साजरे करायचे आहेत. यामुळे भारताची विविधता मजबूत होईल, असेही त्यांनी म्हटलं.

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात -
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात कार्यक्रमाद्वारे देशातील नागरिकांना संबोधित करतात. यामध्ये ते सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासोबतच महिन्यातील प्रमुख उपक्रम आणि आगामी सण, कार्यक्रम यांच्यावरही भाष्य करतात.

बातम्या आणखी आहेत...