आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mann Ki Baat ; Pm Modi ; Statue Of 600 700 Years Old Hanuman Ji Found From Australia, PM Modi Said In Mann Ki Baat

मन की बातमध्ये बोलले पंतप्रधान मोदी:गेल्या सात वर्षात 200 पेक्षा जास्त बहुमूल्य प्रतिमा भारतात आणल्या, मूर्ती परत आणणे आपले कर्तव्य

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' कार्यक्रमातून देश-विदेशातील जनते समोर आपले विचार मांडत आहेत. पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमाची सुरुवात करताना म्हटले की, 'मन की बात' मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 'मन की बात'ची सुरुवात भारताच्या यशाच्या उल्लेखासह करु. या महिन्यात भारत, इटलीहून आपला बहुमुल्य ठेवा आणण्यात यशस्वी झाले आहे. हा ठेवा अवलोकितेश्वर पद्मपाणिच्या हजारो वर्षे जुन्या मुर्ती आहेत.

असेच काही वर्षांपूर्वी तामिळनाडूच्या वेल्लूरहून भगवान आंजनेय्यर, हनुमानजींची प्रतिमा चोरी झाली होती. हनुमानजींच्या या मूर्ती देखील 600-700 वर्षे जुन्या होत्या. या महिन्याच्या सुरुवातीला, ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला या प्राप्त झाल्या आहेत. आपल्या मिशनला प्राप्त झाल्या आहेत.

मूर्ती परत आणणे आपले कर्तव्य
पंतप्रधान मोदींनी म्हटले की, हजारो वर्षांच्या आपल्या इतिहासात, देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये एकापेक्षा एक मूर्ती नेहमीच तयार होतात. यामध्ये श्रद्धा देखील होती, सामर्थ्यही होते, कौशल्य देखील होते आणि ती विविधतांनी भरलेली देखील होती. आपल्या प्रत्येक मुर्तींच्या इतिहासामध्ये तत्कालीन वेळेचा प्रभाव देखील दिसतो. हे भारताच्या मूर्तीकलेचे उत्तम उदाहरण असत होत्या, यासोबत आपली आस्था देखील जुळलेली होती.

मात्र, यापूर्वी देखील अनेक मूर्ती चोरी होऊन भारतातून बाहेर जात होत्या. कधी या देशात, तर कधी त्या देशात या मूर्ती विकल्या जात होत्या आणि त्यांच्यासाठी त्या केवळ कलाकृती होत्या. त्यांना याच्या इतिहासाशी देखील देणे घेणे नव्हते आणि श्रद्धेशी देखील देणेघेणे नव्हते. हे पाहता भारताने आपले प्रयत्न वाढवले आणि याचा परिणाम असा झाला की, चोरी करण्याच्या प्रवृत्तीमध्ये देखील भय निर्माण झाले आहे. या मूर्ती परत आणणे, भारतमातेच्या प्रति आपले कर्तव्य आहे. या मूर्तींमध्ये भारताच्या आत्माचा, आस्थेचा अंश आहे.

गेल्या सात वर्षात 200 पेक्षा जास्त बहुमूल्य मूर्ती भारतात आणण्यात आली आहेत
कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2013 पर्यंत जवळपास 13 प्रतिमा भारतात आणण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या सात वर्षात 200 पेक्षा बहुमूल्य प्रतिमा भारतात आणण्यात आल्या आहेत. अमेरिका, ब्रिटेन, हॉलँड, फ्रान्स, कनाडा, जर्मनी, सिंगापूर अशा अनेक देशांनी भारताची ही भावना समजून घेतली आणि मूर्ता परत आणण्यात आपली मदत केली.

मी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जेव्हा अमेरिकेत गेलो होतो, तेव्हा तिथे मला अनेक जुन्या मुर्ती दिसल्या आणि त्यांच्या सांस्कृतिक महत्त्वाच्या अनेक गोष्टी प्राप्त झाल्या.

जेव्हा देशातील बहुमुल्य ठेवा परत मिळतो, तेव्हा स्वाभाविक आहे की, इतिहासावर श्रद्धा ठेवणारे, archaeology मध्ये श्रद्धा ठेवणारे, आस्था आणि संस्कृतीसोबत जुळलेले लोक आणि एक भारतीयाच्या नात्याने आपणा सर्वांना आनंद मिळतो आणि हे स्वाभाविक आहे.

महिलांच्या नेतृत्त्वाने येत आहे परिवर्तन
पंतप्रधान मोदींनी म्हटले की, तुम्ही एक मोठा बदल होताना पाहत आहात. हा बदल म्हणजे - आपल्या सामाजिक अभियानांमध्ये यश. हे एवढे बदल एवढ्या कमी काळात कसे होत आहेत? हे परिवर्तन येत आहे कारण आपल्या देशात परिवर्तन आणि प्रगतीशील प्रयत्नांचे नेतृत्त्व आता स्वतः महिला करत आहेत. आज आपल्या देशात पार्लियामेंटपासून पंचायतपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात महिला, नवीन उंची प्राप्त करत आहेत. सैन्यातही लेकी आता नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या खांद्यावर घेत आहेत. देशाचे रक्षण करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...