आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Mann Resignation From The Supreme Court Committee, The Tenth Meeting Today To Find A Solution From The Discussion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलनाचा 50 वा दिवस:सुप्रीम कोर्टाच्या कमिटीतून मान यांची माघार, चर्चेतून तोडगा काढण्यासाठी आज दहावी बैठक

कुंडली बॉर्डरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

५० दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या विशेष समितीतून भूपिंदरसिंग मान यांनी माघार घेतली आहे. वास्तविक कोर्टाने ही समिती नेमली तेव्हाच शेतकरी संघटनांनी हे सर्व सदस्य केंद्र सरकारचे समर्थक असल्याचा आरोप केला हेाता. मान हे स्वत: शेतकरी नेते असून त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. ज्या भारतीय किसान युनियनचे ते अध्यक्ष होते त्या संघटनेनेही त्यांना हटवण्याची घोषणा केली होती. यामुळे मान यांच्यावर दबाव अधिक वाढला. यानंतर काही वेळातच त्यांनी स्वत: सुप्रीम कोर्टाच्या समितीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. तेव्हापासून मान यांचा मोबाइल बंद आहे. मान यांची माघार हा शेतकऱ्यांचा वैचारिक विजय असल्याचे शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी म्हटले आहे. मान यांनी दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. “आम्ही कोर्टाचा सन्मान करतो, परंतु कोणत्याही स्थितीत समितीशी आम्ही चर्चा करणार नाही,’ असे टिकेत म्हणाले.

शेतकऱ्यांची भेट घेऊ : घनवट
मान बाहेर पडल्यानंतर समितीत आता तीन सदस्य आहेत. समितीचे सदस्य अनिल घनवट म्हणाले- ‘मान यांच्याशी माझे बोलणे झाले नाही. त्यांचा फोन बंद आहे. पण सुप्रीम कोर्टाने जी जबाबदारी दिली आहे ती आम्ही पार पाडू. आम्ही शेतकऱ्यांना भेटू.” दुसरीकडे, शेतकरी नेते डॉ. दर्शनपाल म्हणाले की, समितीसमोर म्हणणे मांडण्याचा काहीही फायदा नाही.

आम्ही बैठक घेऊ : कृषिमंत्री तोमर
शेतकरी व सरकार यांच्यात शुक्रवारी १० वी बैठक होईल. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले,‘शुक्रवारी दुपारी १२ वाजता शेतकरी संघटनांशी चर्चा करू. ही चर्चा सकारात्मक राहील, अशी अपेक्षा आहे. समिती आपले काम करून कोर्टाला अहवाल देईल. आमची चर्चा त्यापेक्षा वेगळी आहे.’

मान म्हणाले, शेतकऱ्यांसाठी कोणत्याही सन्मानाचा बळी देईन
‘मी शेतकऱ्यांच्या भावना समजतो. मी आमचे शेतकरी आणि पंजाबसाठी कायम प्रामाणिक राहीन. यासाठी मी एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित पदाचाही बळी देऊ शकतो. म्हणूनच मी माघार घेतली.’