आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी आईच्या पोटचा मुलगा देशभक्त असू शकत नाही:गीतकार मनोज मुंतशीर यांची राहुल गांधींवर टीका; म्हणाले - प्रॉब्लम DNAचा

भोपाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळमध्ये गीतकार मनोज मुंतशीर म्हणाले - परदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा देशभक्त असू शकत नाही. प्रॉब्लम DNAचा आहे. हे वादग्रस्त विधान त्यांनी सोमवारी रात्री रवींद्र भवनात आयोजित एका कार्यक्रमात केले. ते म्हणाले - भारत जगातील एकमेव देश आहे, जिथे देशभक्ती शिकवावी लागत नाही. ती आपल्याला आपल्या डीएनएतून मिळते. आताच आपण चीनला पळवून लावले.

मुंतशीर म्हणाले - आपल्या देशाचे सैनिक चिनी सैनिकांचा मार खात आहेत असे एक अत्यंत बेजबाबदार राजकारणी म्हणतो तेव्हा आम्हाला दुःख होते. एवढ्या लज्जास्पद भाषेचा वापर कुणी कसा करू शकतो. पण मी त्याला दोष का देऊ. मी चाणक्य वाचला आहे. मी आचार्य विष्णुगुप्त चाणक्याचे स्टेटमेंट कोट करतो - परदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशभक्त असू शकत नाही.

मुंतशीर म्हणाले - मी ओठांत गंगा व हातांत तिरंगा असणाऱ्या भारताचा आहे. भारताचा अर्थ केवळ इंडिया नाही. भारत दोन धातूंनी तयार झाला आहे. 'भा' व 'रत'. 'भा' चा संस्कृतमध्ये प्रकाश असा अर्थ होतो. तर 'रत'चा अर्थ व्यस्त असणारा असा होतो. म्हणजे सातत्याने प्रकाशाच्या शोधात व्यस्त असणारा भारत. मुंतशीर आपल्या 'तेरी मिट्‌टी में मिल जावां...' या गाण्याच्या तालावर मंचावर आले होते.

काँग्रेसचे प्रत्युत्तर

मनोज मुंतशीर यांच्या या विधानावर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. त्या एका ट्विटमध्ये म्हणाल्या - किरायाचे नाव व चोरीचे गाणे लिहिणाऱ्या मनोज मुंतशीर ज्या आईचा परदेशी म्हणून अवमान करत आहेत, त्या लोकशाहीत 6 वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. संघी संधीसाधू - दाम्पत्य, आईची स्थिती व भारताची संस्कृती समजू शकत नाहीत. तथाकथित कवीपासून सडकछाप चार आण्याचा ट्रोल बनण्यात फार वेळ लागत नाही.

राहुल म्हणाले होते - चीनकडून आपल्या सैनिकांना मारहाण

गत 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशाच्या तवांगमध्ये भारतीय सैनिकांची चिनी सैनिकांसोबत हिंसक चकमक झाली होती. त्यात भारतीय सैनिकांनी घुसखोरी करणाऱ्या चीनच्या जवळपास 300 सैनिकांना पिटाळून लावले होते. त्यानंतर शुक्रवारी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला चीनविरोधात सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता. ते म्हणाले होते - चीन युद्धाची तयारी करत आहे. तर आपले सरकार अजून झोपलेले आहे. चिनी सैनिक आपल्या जवानांना अरुणाचल प्रदेशात मारहाण करत आहेत.

भोपाळच्या रवींद्र भवनात हा कार्यक्रम झाला. आपल्याला परदेशी हल्लेखोरांचे उपकार माणण्यास शिकवण्यात आले, असे मनोज मुंतशीर यावेळी बोलताना म्हणाले.
भोपाळच्या रवींद्र भवनात हा कार्यक्रम झाला. आपल्याला परदेशी हल्लेखोरांचे उपकार माणण्यास शिकवण्यात आले, असे मनोज मुंतशीर यावेळी बोलताना म्हणाले.

आपले राजे रस्त्याशेजारी चटई टाकून थोडेच झोपत होते...

मुंतशीर म्हणाले - भारताने शून्य दिल्यानंतर जगाला मोजणी जमली. ताऱ्यांची भाषा भारताने जगाला पहिल्यांदा शिकवली. भारताने डेसिमिल दिला नसता चंद्रावर जाणेही अवघड झाले असते. पृथ्वी व चंद्राच्या अंतराचा अंदाज बांधणे अवघड झाले असते.

माझ्या व तुमच्या भारताचे अवघ्या जगाने अनुसरण केले. पण काही बुद्धिजीवी अनेक वर्षांपासून आपल्याला आपले काहीच नसल्याचा कानमंत्र देत होते. तुम्हाला लिटरेचर येत नव्हते. तसेच कविताही येत नव्हत्या. तुमच्याकडे काहीच नव्हते, असे ते आपल्याला सांगत होते.

काही परदेशी आक्रमणकर्ते आपल्याला लुटण्यासाठी आले. त्यांचे आपण उपकार मानावे असे आपल्याला शिकवण्यात आले.

मी सांगू इच्छितो की, जगातील पहिले संग्रहित काव्य वाल्मिकी रामायण आहे. हे कुणी लिहिले. आपल्याच ऋषींनी. मेघदूत कालिदासजींनी अडीच वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात लिहिले. ....आणि तुम्ही आम्हाला सांगत आहात की शायरी आम्ही तुम्हाला दिली, तुम्हाला तर लिहिणेही येत नव्हते.

ते आम्हाला तुम्हाला संगीत येत नसल्याचेही सांगत होते. पण नादाला ब्रह्म म्हणणारी आमची पहिली संस्कृती आहे. आमच्यापूर्वी कुणालाही हे माहिती नव्हते. संगीताचे पहिले शास्त्र आपले सामवेद आहे. त्यानंतरही तुम्ही आमच्याकडे काहीच नव्हते असा दावा करता.

ते लाल किल्ला आम्ही बांधल्याचाही दावा करतात. लाल किल्ल्याचा आपण सर्वजण आदर करतो. ती आपली मालमत्ता आहे. पण राजा भोज कुठे राहत होते हे सांगा? ते राजवाड्यात राहत नव्हते काय? महाराज विक्रमादित्य कुठे राहत होते. होम राजा, चंद्रगुप्त मौर्य कुठे राहत होते. हे सर्वजण रस्त्याच्या कडेला चटई अंथरून झोपत होते काय?

आपल्याला वर्षानुवर्षे गुलामीच्या मानसिकतेकडे लोटण्यात आले. पण आता जग बदलले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...