आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 राज्यांवर ढग रुसले:गुजरातेत 47% कमी पाऊस, तर महाराष्ट्रात 3% जास्त! जूनच्या सुरुवातीस 101% मान्सूनची होती आशा... आता 96 टक्केच राहण्याची चिन्हे

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वीलेखक: अनिरुद्ध शर्मा
 • कॉपी लिंक
 • ऑगस्टमध्ये 24.1% पर्यंत कमी पाऊस पडल्यानंतर हवामान खात्याने अंदाजात केली सुधारणा

जूनमध्ये अपेक्षपेक्षा जास्त पावसाची शक्यता दिसत होती. मात्र आता तो सरासरीच्याही किमान रेंजपर्यंतच मर्यादित राहण्याची चिन्हे आहेत. बुधवारी हवामान खात्याने (आयएमडी) आपला सुधारित मान्सूनचा अंदाज जाहीर केला. जूनमध्ये मान्सूनच्या आगमनापूर्वी आयएमडीने म्हटले होते की, यंदा सरासरीच्या १०१% पावसाची शक्यता आहे. बुधवारी आयएमडीने सांगितले की, मान्सून सरासरीइतकाच पडेल. मान्सूनमध्ये ९६% ते १०४% पर्यंत पाऊस सामान्य समजला जातो. मात्र, यंदा तो ९६% पर्यंतच राहण्याची चिन्हे आहेत. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा २४.१% पर्यंत कमी पाऊस पडला आहे.

मान्सून काळात देशात ८८० मिमी पाऊस पडतो. १ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत देशभरात सामान्यरीत्या ७१०.४ मिमी पाऊस पडायला हवा. मात्र यंदा ६४५ मिमीच पाऊस झाला. म्हणजे आताच ९ पर्यंत तूट आहे. राज्यनिहाय पाहिल्यास आजवर २० राज्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला आहे. गुजरातेत सरासरीपेक्षा ४७% तर मणिपूरमध्ये ५९% कमी पाऊस झाला. १० राज्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. बिहारमध्ये १७% तर तेलंगणमध्ये २८% जास्त पाऊस पडला आहे.

...आणि येथे जास्त

 • तेलंगण 28%
 • तामिळनाडू 26%
 • आंध्र प्रदेश 21%
 • दिल्ली 20%
 • सिक्कीम 18%
 • बिहार 17%
 • हरियाणा 14%
 • पश्चिम बंगाल 7%
 • महाराष्ट्र 3%
 • कर्नाटक 3%

येथे पाऊस कमी

 • मणिपूर -59%
 • गुजरात -47%
 • जम्मू-काश्मीर -30%
 • ओडिशा -29%
 • पंजाब -24%
 • नागालँड -24%
 • केरळ -22%
 • मिझोराम -20%
 • आसाम -19%
 • हिमाचल प्रदेश -18%
 • छत्तीसगड -15%
 • त्रिपुरा -15%
 • अरुणाचल प्रदेश -15%
 • मेघालय -13%
 • राजस्थान -10%
 • उत्तर प्रदेश -8%
 • मध्य प्रदेश -7%
 • उत्तराखंड -5%
 • झारखंड -5%
 • गोवा -4%

राज्यात ५ जिल्ह्यांत तूट, २२ जिल्ह्यांत सरासरीइतका राज्यात ऑगस्टअखेर ५ जिल्ह्यांत पावसाची तूट पडली आहे. २२ जिल्ह्यांत सरासरीइतका तर ९ मध्ये जास्त पावसाची नोंद झाली. आयएमडीनुसार, ऑगस्टअखेर ८३२.४ मिमी पाऊस अपेक्षित असताना ८६०.४ मिमी (+३%) पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ५% जास्त , मराठवाड्यात २० % जास्त तर विदर्भात १४ % कमी पावसाची नोंद झाली आहे. तुटीचे जिल्हे : नंदुरबार, गोंदिया अमरावती, बुलडाणा, गडचिरोली. सरासरीहून जास्त पाऊस : सातारा, सोलापूर, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, मुंबई उपनगर. सरासरीइतका : धुळे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सांगली, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ. पावसाचा जोर कमी होणार : २ ते ५ सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर कमी राहील. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस शक्य.

१२१ वर्षांत फक्त १५ वेळाच ऑगस्टच्या पावसातील तूट १६% पेक्षा जास्त
हवामान विभागाच्या १२१ वर्षांच्या नोंदीत ऑगस्टमध्ये ज्या १५ वर्षांत १६% पेक्षा जास्त तूट राहिली आहे, त्यापैकी ९ वर्षांत अल-निनो आणि निगेटिव्ह आयओडी होता. या वर्षी अल-निनो न्यूट्रल राहिला, पण निगेटिव्ह आयओडीमुळे ऑगस्टमध्ये पाऊस २४.१% पेक्षा कमी राहिला.

हिंदी महासागराच्या तापमानाने शोषून घेतला पाऊस
आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, ऑगस्टमध्ये सामान्यत: कमी दाबाची दोन क्षेत्रे निर्माण होतात, तेे यंदा घडले नाही. त्याशिवाय किमान ४ कमी दाबाची क्षेत्रे तयार होतात, तीही दोनच झाली. त्यामुळे पश्चिम प्रशांत भागात चक्रीवादळे कमी राहिली. मान्सूनचा आस बहुतांश दिवस सामान्य स्थितीपेक्षा हिमालयाच्या पायथ्याशी राहिला. परिणामी मध्य व दक्षिण भारतात पाऊस कमी राहिला. हे सर्व प्रामुख्याने निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोलमुळे झाले.

सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा १०% जास्त पाऊस होण्याची शक्यता
सप्टेंबरमध्ये सरासरीच्या १०% जास्त पावसाची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये सरासरी १७० मिमी पाऊस होतो. मध्य भारताच्या अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त आणि उत्तर-पश्चिम, उत्तर-पूर्व आणि दक्षिणेत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

यामुळे मान्सूनवर परिणाम
इंडियन ओशन डायपोल पश्चिम हिंदी महासागराचे पूर्व हिंद महासागराच्या तुलनेत आळीपाळीने उष्ण-थंड होणे आहे. पश्चिमेकडील भाग पूर्वेपेक्षा उष्ण असल्यास पॉझिटिव्ह फेज म्हणतात. याउलट स्थितीस निगेटिव्ह फेज म्हणतात. नेमकी हीच स्थिती सध्या सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...