आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Many Countries Are Reporting Corona, India Will Also Benefit If It Shows Transparency Joe Derridi; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:अनेक देश कोरोनाची माहिती देत आहेत, भारतानेही पारदर्शकता दाखवल्यास फायदा होईल - जो डेरिजी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • झुकेरबर्ग बायोहबचे सहसंस्थापक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक जो डेरिजी यांच्याशी विशेष चर्चा
  • सर्व मुलांच्या लसीकरणाआधी शाळा उघडणे चुकीच

२०२० मध्ये कॅलिफोर्नियात मोफत कोविड चाचणी सुरू करणारे चॅन-झुकेरबर्ग बायोहबचे सहसंस्थापक जो डेरिजी भारतातील दुसऱ्या लाटेला जगासाठी धोका समजत आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठात बायोकेमिस्ट्री व बायोफिजिक्सचे प्राध्यापक डेरिजी सांगतात मी, भारतात माहितीतील पारदर्शकतेशिवाय योग्य आकलन शक्य नाही. दैनिक भास्करसोबत विशेष चर्चेत त्यांनी सांगितले की, पारदर्शकतेअभावी भारत इतर देशांसारखा प्री-प्रिंट सर्व्हरवर माहिती देत नाही. चर्चेतील मुख्य अंश-

शाळा पुन्हा सुरू कधी होतील याबाबत काय वाटते?
माझे राज्य कॅलिफोर्नियाबाबत बोलायचे तर १२ वर्षांखालील मुलांना लस दिलेली नाही. आम्ही आजपासून सुरुवात केली आणि २ वर्षांवरील सर्व मुलांची चाचणी करून त्यांना लस दिली तरी पुढील वर्षी सप्टेंबरच्या प्रारंभी शाळा उघडतील. असे झाले तर मला खूप बरे वाटेल. याशिवाय मुलांच्या संसर्गाची भीती कायम राहील.

जग व भारतात कोरोनाविरोधातील लढाईकडे कसे बघता?
माहिती उपलब्ध असल्याने कोरोनाबाबतचे माझे मत अमेरिकेपर्यंतच मर्यादित आहे. मी कॅलिफोर्नियात काम करतो आणि येथील माहिती पारदर्शक आहे. यामुळेच मी भारताच्या स्थितीबाबत एका तज्ज्ञासारखे बोलू शकत नाही. हाे, एवढे नक्कीच सांगेन की भारताने मला चकित केले आहे. लस न घेताच जगात सर्वाधिक गर्दी भारतात करण्यात आली. भारताने कोरोनाविरोधात नव्हे तर कोरोना वाढवण्याचे काम केले आहे. अनेक देशांत असे झाले, मात्र भारताची तुलनाच नाही. विषाणूला भारतात मिळालेल्या या संधीमुळे जगाला बूस्टर डोसवर काम करावेच लागेल. भारताचा फार्मा उद्योग अत्याधुनिक आहे. सर्वांना लस मोफत द्यायला हवी. ही राष्ट्रीय आणीबाणी आहे.

डेटामध्ये पारदर्शकता कशी येईल? भारतासारख्या काही देशांचा डेटा शास्त्रीय अहवालात का नाही?
पारदर्शकतेसाठी पूर्ण देशात एक राष्ट्रीय माहिती प्रणाली आवश्यक आहे. त्याचा वापर देश-विदेशात सर्वांसाठी असावा. या प्रणालीत प्रश्न विचारण्याची मुभा असावी. आज जगात अनेक प्री-प्रिंट सर्व्हर झाले आहेत, या ठिकाणी जगभरातून कोरोनाची शास्त्रीय माहिती येते आणि ती सर्वांसाठी उपलब्ध आहे. मी अशा दोन सर्व्हरची उदाहरणे देऊ शकतो, कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबद्वारे संचालित bioRxiv.org आणि medRxiv.org. जर भारताचा डेटा अशाच प्री-प्रिंट सर्व्हरवर आला तर त्यांनाही धोरणात्मक फायदा होईल.

मागील एका वर्षात कोरोनाबाबत एखादी खुशखबर आहे का?
लस सर्वात मोठी खुशखबर आहे. सॅन फ्रान्सिस्कोत आम्ही लस घेतलेल्या लोकांची जानेवारीपासून चाचणी करत आहोत. ९९.९९% प्रकरणांत आम्हाला मॉडर्ना आणि फायझरची लस प्रभावी दिसत आहे. मी इतर लसींबाबत सांगू शकत नाही कारण त्यांच्या वापराचे मूल्यांकन मी केलेले नाही. माझ्या शहरात जूनच्या मध्यापर्यंत आम्ही ८०% लोकांना लस दिलेली असेल. महामारी रोखण्यासाठी सर्वांची मोफत चाचणी करणे आणि मोफत लस देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

भविष्यातील उपाय काय आहेत?
आजचीच समस्या बघा. अधिकारी माहिती लपवत आहेत, इतिहास साक्षी आहे की आरोग्याशी संबंधित डेटा लपवणे किंवा त्यात पादर्शकता न बाळगणे खूपच घातक ठरले आहे. सर्वात महत्त्वाचा उपाय हा की, आरोग्य सुविधा राजकारणापासून वेगळ्या असाव्यात. सरकारचे काम आरोग्यसेवा चालवणे नव्हे तर संसाधन उपलब्ध करून देणे असायला हवे. निर्णय डॉक्टर, शास्त्रज्ञांना घेऊ द्यायला हवेत.

भविष्यातील आरोग्य यंत्रणा कशी हवी आणि आमच्याकडे संसाधने उपलब्ध आहेत का?
जगभरातील स्थानिक आरोग्य यंत्रणांना आपसात जोडायला हवे म्हणजे त्यांना सतत एकमेकांशी माहितीची देवाणघेवाण करता येईल. यातून कोणता आजार कोठे होत आहे, जो जगात पसरू शकतो याची माहिती होईल. आमच्याकडे सर्व तंत्रज्ञान आहे. जर जगाने इच्छाशक्ती दाखवली तर एक ते दोन वर्षात आपण आधुनिक इंटिग्रेटेड इंटरडिपेंडंट हेल्थ सिस्टिम उभी करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...