आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामविलास पासवान यांना आदरांजली:'देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली'; पंतप्रधान मोदींपासून अनेक नेत्यांची रामविलास पासवान यांना आदरांजली

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय राजकारणातील मुरब्बी राजकारणी, हवामान शास्त्रज्ञ अशी ओळख असलेले आणि लोकजनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांचे आज (8 ऑक्टोबर) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनावर देशभरातून दुःख व्यक्त केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या जाण्याबद्दल आदरांजली वाहिली आहे. मी एक मित्र आणि मूल्याधिष्टित सहकारी गमावला आहे, अशी प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'कठोर मेहनत आणि जिद्दीने रामविलास पासवान राजकारणाच्या शिखरावर पोहोचले होते. ते एक विलक्षण खासदार आणि मंत्री होते. मी रामविलास पासवान यांच्या जाण्याने खूप दुःखी आहे. देशाच्या राजकारणात एक मोठी पोकळी तयार झाली आहे. ही पोकळी कधीही भरुन निघणार नाही. रामविलास पासवान यांचं निधन हे माझ्यासाठी व्यक्तिगत नुकसान आहे. मी एक मित्र, मूल्याधिष्टित सहकारी आणि गरीबांना सन्मानाचे जगणे देण्यासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या व्यक्तीला गमावले आहे. पासवान यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे हा एक अविश्वसनीय अनुभव होता. '

शरद पवार म्हणाले, 'रामविलास पासवान यांच्या निधनाने दुःख झाले. ते एक ज्येष्ठ नेते आणि लोकशक्ती पक्षाचे संस्थापक होते. एक संसदपटू म्हणून माझा त्यांच्यासोबत जवळून संबंध आला. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझी सहवेदना.ट

राहुल गांधी म्हणाले, टरामविलास पासवान यांच्या अकाळी निधनाने खूप दुःख झाले. गरीब-दलित वर्गाने आज आपला एक बुलंद राजकीय आवाज गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.'

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, 'देशाने एक दूरदर्शी नेता गमावला. रामविलास पासवान हे संसदेचे सर्वात सक्रिय आणि प्रदीर्घ सदस्य होते. ते दलितांचा आवाज होते. त्यांनी डावललेल्या लोकांसाठी नेहमी लढा दिला.'

गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 'आपल्या सर्वांचे लाडके रामविलास पासवान यांच्या निधनामुळे मन अत्यंत अस्वस्थ झाले आहे. ज्यांनी नेहमीच गरीब व वंचितांच्या कल्याणासाठी व हक्कांसाठी संघर्ष केला, त्यांनी नेहमीच आपल्या राजकीय जीवनात राष्ट्रीय हित आणि लोककल्याणासाठी काम केले. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.'

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, 'केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन माझ्यासाठी अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या दीर्घ राजकीय आयुष्यात त्यांनी नेहमीच गरीब, दलित आणि वंचितांच्या कल्याणासाठी काम केले. बिहारच्या मातीशी जोडलेल्या जेष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांच्या निधनाने दुःख झाले. राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या पासवान यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली होती, त्यांच्या निधनाने शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला आहे.'

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या आकस्मिक निधनाबद्दल जाणून वाईट वाटले. अनेक दशके त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले. बिहारच्या राजकारणामध्ये आणि विकासात त्यांनी मोठी भूमिका बजावली. गोरगरीब व वंचितांच्या उन्नतीसाठी केलेला त्यांचा संघर्ष कायम लक्षात राहील. या महान नेत्याला मनापासून श्रद्धांजली.'

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser